बीडमध्ये आढळले अर्भक!

बीड : शहरातील जालना रोडवरील टाटा शोरूमच्या समोर एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी शिवाजीनगरचे सहायक निरीक्षक अमोल गुरले, बीड शहरचे अशपाक सय्यद, मनोज परजने आदींनी धाव घेतली, तसेच घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये अर्भक […]

Continue Reading
acb trap

महावितरणच्या तंत्रज्ञाला एसीबीचा झटका!

बीड दि.1 : पेट्रोल पंपासाठी लाईट कोटेशन भरुन नवीन मीटर बसवून देण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञाने 7 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी बीड एसीबीने (beed acb team) मंगळवारी (दि.1) कारवाई करत लाचखोर तंत्राज्ञावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बाळासाहेब श्रीरंग मोटे (वय 43) (balasaheb shrirang mote) असे महावितरणच्या धर्मापुरी कार्यालयातील लाचखोर तंत्रज्ञाचे […]

Continue Reading

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

सिरसाळा दि.1 : सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना धारूर तालुक्यातील कुंडी येथे मंगळवारी (दि.1) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. रंगनाथ छत्रभुज काळे (वय 31 रा.कुंडी ता.धारुर) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी पहाटे जनावराच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत रंगनाथ यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलिसांनी […]

Continue Reading
MURDER

बीडमध्ये दगडाने ठेचून तरुणाचा खून!

बीड दि.1 : तालुक्यातील चऱ्हाटा फाटा येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.1) सकाळी उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पांडुरंग नारायण माने (रा.आनंदवाडी ता.बीड) असे मयताचे नाव आहे. दगडाने ठेचून पांडुरंग यांचा खून करण्यात आला असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश […]

Continue Reading

बीडसह परराज्यातील चोरीच्या 22 दुचाकी केल्या जप्त!

बीड दि.31 : बीड जिल्ह्यासह पर राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या बीड स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्याकडून तब्बल 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोकुळदास मगर बोरगे, धर्मराज कल्याण बोरागे (रा.बाबुलखुंटा ता. जि बीड) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष […]

Continue Reading

31 लाखांचा गुटखा पकडला; महारुद्र मुळेसह तिघांवर गुन्हा!

बीड दि. 30 : गुटख्याचा टेम्पो शनिवारी (दि.29) रात्रीच्या सुमारास पाली परिसरात अडवला, मात्र पळून जाण्यासाठी चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न करून भरधाव वेगाने टेम्पो गेवराईच्या दिशेने पळवला, पाडळशिंगी टोलनाक्यावरील पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी सदरील टेम्पो पकडला. त्यामधे 31 लाख रुपयांचा गुटखा, टेम्पो, मोबाईल असा 46 लाख 28 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading