aurangabad-high-court

पाठक अडकले मात्र महामार्ग भूसंपादन घोटाळ्यातील दोन आरोपींना जामीन!

बीड दि.1 : राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 भूसंपादनातील वाढीव मोबदला (मावेजा) प्रकरणातील आरोपी त्रिंबक भानुदास पिंगळे आणि शेख अजहर यांना जामीन मंजूर केला आहे. हा आदेश न्या. अभय वाघवसे यांनी दिला. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), बीड सतीश धुमाळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बीड येथील भूसंपादन कार्यालय […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री बीडमध्ये असतांना 45 लाखांची लाच स्विकारली!

केशव कदम बीडदि.31 : पाचशे, हजार नव्हे तर तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने शुक्रवारी (दि.31) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई बीड जिल्ह्यात असतांना अधिकार्‍याने एवढी मोठी लाच घेण्याची हिंमत केली आहे. या कारवाईने जिल्ह्यात […]

Continue Reading

घरकूल ओटीपी घोटाळा; एक आरोपी अटकेत!

केशव कदम : बीड घरकुलच्या नावाखाली अनाधिकृत वाळूघाट तयार करुन 25 हजार ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी महसूल सचिवांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर चकलांबा पोलीस ठाण्यात नायब तहसीलद संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन महसूल, पोलीस, एजंट अशा 19 जणांवर गुन्हा दाखल आहे. यातील अमोल अप्पासाहेब लाखे (रा.एरंडगाव ता.गेवराई जि.बीड) यास […]

Continue Reading
बीड नगर पालिकेने एलईडीचे पथदिवे घेतले की सोन्याचे?

48 खोक्यांचा वाद ; बीड पालिकेत सत्तांतर घडवून आणणार!

– फारूख पटेल, अमर नाईकवाडे, विनोद मुळूक यांच्यासह 11 जणांचा एक, तर निजाम आणि मुजीब यांचा दुसरा गट सिद्दीख इनामदार । बीडदि.28 : बीड नगर पालिकेत अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी मिळून उपनगराध्यक्षपदी विनोद मुळूक यांना बसवल्यानंतर आता सहाच महिन्यात या आघाडीची बिघाडी झाली आहे. यापुर्वी रस्ते कामासाठी आलेले 22 कोटी रुपये […]

Continue Reading
NAVNEET KAVANT

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत अंबाजोगाईत दोन दिवस मुक्कामी

-चांगल्या कामगिरीला ’रिवॉर्ड’, कामचुकारांवर होणार कारवाई बीड दि.28 : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हे 28 व 29 जुलै रोजी अंबाजोगाई येथे दोन दिवस मुक्कामी राहून येथील पोलीस विभागाच्या सर्व शाखांची सखोल पाहणी करणार आहेत. प्रत्येक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेताना अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जाणार असून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना ‘रिवॉर्ड’ दिले जाणार […]

Continue Reading

ड्रोनद्वारे केली मोजणी ; 10 हजारब्रास वाळूसाठा जास्त आढळला!

-एसडीओ शुभम पवार यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल केशव कदम । बीड दि.28 : गेवराई तालुक्यातील बोरगाव बु.-1, बोरगाव बु.-2 आणि सावरगाव येथील वाळूसाठ्याच्या मोजणीत मोठी तफावत आढळून आली आहे. टेंडरधारकांनी सादर केलेल्या वाळूसाठ्याच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष उपलब्ध साठा कमी असल्याचे ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोजणीत समोर आले आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी शुभम पवार यांनी अहवाल जिल्हाधिकारी विवेक […]

Continue Reading
GHATNANDUR CRIME

घाटनांदूरमध्ये २१ वर्षीय युवकाचा चाकूने वार करून खून

घाटनांदूर (प्रतिनिधी) : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका २१ वर्षीय तरूणाचा तिक्ष्ण हत्याराने (चाकूने) वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वरचा एक साथीदार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात […]

Continue Reading

बीडमध्ये एसीबीचा ट्रॅप ; 3 हजाराची लाच घेताना लाचखोर पकडला

केशव कदम बीड दि. १० : दोन दिवसापूर्वीच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास ट्रॅपचा झटका दिल्यानंतर आज पुन्हा एक कारवाई बीडमध्ये करण्यात आली. जात पडताळणी प्रमाणपत्राच्या कामासाठी ३ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना समाजकल्याण विभागातील अधिलेखापाल राठोड अण्णासाहेब गबरू याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी (दि.१०) रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भातील काम करून […]

Continue Reading

स्वाक्षरीसाठी पाच हजारांची लाच ; बीड एसीबी कारवाई

केशव कदम बीड दि.7 : लाजकोरीच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. त्यात अंबाजोगाई येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष कुंडलिक डाकरे यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक्वा प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर […]

Continue Reading

बापरे ! जालना एसीबीने बीडमध्ये एकाचवेळी तीन लाचखोरांना पकडले

केशव कदम | बीड दि. ३० : बीड जिल्ह्यात लाचखोरीने आता कहरच केला आहे. कोणतेही काम पैशाचे वजन ठेवल्याशिवाय होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. ३० जून) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच कारवाईत सहकार विभागातील तीन लाचखोरांना रंगेहात पकडले. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सावकारी […]

Continue Reading