beed bus stand

लग्नाला जातांना महिलेचे बीड बसस्थानकातून अडीच लाखांचे दागिने चोरी!

बीड दि.13 ः मैत्रीणीच्या मुलीच्या लग्नाला जात असताना महिलेने सोबत बॅगमध्ये दागिने घेतले. बीड बसस्थानकात आल्यानंतर कुणीतरी बॅगमधील दागिने चोरी केले. तब्बल अडीच लाख रुपयांचे दागिने चोरी गेले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा प्रदिप सावंत (रा.आदर्शनगर, सिद्धी विनायक रेसिडेन्सी बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्राच्या मुलीच्या […]

Continue Reading

अंगाला धक्का लागल्यामुळे केला खून; स्वतः ठाण्यात येवून आरोपीची कबुली!

सिरसाळा दि.12 ः पान टपरीवर पुडी घेण्यासाठी जात असताना अंगाला धक्का लागला म्हणून दोघात वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, यात एकाचा बळी गेला. ही धक्कादायक घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे घडली असून स्वतः आरोपीने पोलीस ठाण्यात हजर होवून खून केल्याची कबुली दिली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास […]

Continue Reading

उसण्या पैशाला तगादा लावल्याने अपहरण करुन तरुणास मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; माजलगाव शहरातील घटनामाजलगाव दि.12 ः. उसने घेतलेले पैसे मागण्याचा तगादा का लावला या कारणाने एका 24 वर्षीय मजुर युवकाला सिनेस्टाईल अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवार, 10 रोजी रात्रीच्या दरम्यान शहरापासून जवळ असणार्‍या एमआयडीसी भागात घडली. दरम्यान या प्रकरणातील दोघांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]

Continue Reading

पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना पोलीस कोठडी

बीड दि.11 : परळी येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नऊ वर्षापूर्वीच्या कोठडीतील मृत्यु प्रकरणात ही कारवाई झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला होता. […]

Continue Reading

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न असणार – आयजी डॉ.चव्हाण

बीड दि.10 : गुन्हे प्रतिबंध करणे, गुन्हे उघडकीस आणणे त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या तीन गोष्टीवर भर दिला जाणार आहे. पोलीस दलात काम करत असताना समजाचीही मदत महत्वाची असते. बेसिक कामावर फोकस असणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले. बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी (दि.10) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

जिल्ह्यातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची टक्केवारी विरोधात जनआंदोलन उभारणार!

बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरेंचा इशारा बीड दि. 10 : मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग यासह सर्व विभागातील अधिकारी बरबटले आहेत. याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांच्याकडून टक्केवारी घेण्यास सुरू झाली आहे. यामुळे जिल्हयाचा विकास झाला नाही पण लोकप्रतिनिधींची भरभराट झाली. ही टक्केवारी अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्याची […]

Continue Reading