corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडा वाढला!

बीड दि.8: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर आली आहे. शनिवारी (दि.8) जिल्ह्यात 26 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्हा आरोग्य विभागास 1 हजार 737 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 26 पोझिटीव्ह आढळून आले असून 1 हजार 711 निगेटिव्ह […]

Continue Reading

पंकज कुमावतांच्या पथकाचा छापा; 19 मटकाबहाद्दर ताब्यात!

बीड दि.5 : सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अवैध धंद्यावर जिल्हाभरामध्ये कारवाईचा धडाका सुरुच आहे. बुधवारी (दि.5) दुपारी माजलगाव शहरामध्ये मटका व ऑनलाईन लॉटरी घेणार्‍या अड्ड्यावर धाड टाकली. दोन्ही कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्त करत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई माजलगाव शहरात खळबळ उडाली आहे. माजलगाव शहरातील […]

Continue Reading
DEATH BODY

स्मशानभूमी नसल्याने मृतदेह थेट तहसील कार्यालयात

केज दि.5 : गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. सोनेसांगवी येथे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर बुधवारी (दि.5) सकाळी नातेवाईकांनी मृतदेह थेट केज तहसील कार्यालयात आणला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सोनेसांगवी येथील लक्ष्मीबाई शहाजी कसबे या महिलेचे निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी कुठं करावी? हा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी […]

Continue Reading
accedent

ट्रॅक्टर-दुचाकीच्या अपघातात पैलवानाचा मृत्यू

सिरसाळा दि.5 : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये पैलवानाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास सिरसाळा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली. दरम्यान याच चौकात आठवड्यात तीन अपघातात तिघांचा मृत्यू झालेला आहे. या चौकात वाहतूक पोलीसांची कायस्वरुपी नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. पैलवान बाबुराव बळीराम सलगर (वय 38 रा.मालहिवरा) हे दुचाकीवरुन जात होते. यावेळी […]

Continue Reading