acb office beed

लाच घेताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष नरवडे व पुरवठा अधिकारी जाळ्यात

माजलगाव : मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस टी कुंभार यांना शुक्रवारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. -येथील तहसील कार्यालयात कार्यरत एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटना […]

Continue Reading
parali mataka booki

परळीत मटका बुकीवर छापा; 114 जणांवर गुन्हा

आयपीएस पंकज कुमावत यांच्या कारवाईने खळबळ परळी : सहायक पोलीस अधीक्षक असलेल्या आयपीएस पंकज कुमावत यांच्या कारवायांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा मारल्यानंतर आता परळीत गुरुवारी (दि.30) रात्री धडाकेबाज कारवाई केली. शहरातील एका मटका बुकीवर छापा मारला असून परळी शहर ठाण्यात 114 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुप्त बातमीदारामार्फत […]

Continue Reading
MURDER

अंधश्रद्धेतून पत्नीची हत्या!

गेवराई दि.31 : अंधश्रद्धेच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील खांडवी येथे शुक्रवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संजीवनी पिराजी शेजुळ (वय 60 रा.खांडवी ता.गेवराई) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. पिराजी शेजुळ (वय 65) […]

Continue Reading

राजेंद्र मस्केंच्या जुगारअड्ड्यावर पकडलेले आरोपी हायप्रोफाईल!

बीड, दि.29 : शहरापासून जवळच असलेल्या तळेगाव परिसरातील मस्के यांच्या शेतात यश स्पोर्ट क्लबमध्ये मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकण्यात आला. या छाप्यात तिर्रट नावाचा जुगार खेळताना 47 जुगारी आढळून आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात क्लब चालक, जागा मालक अशा 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव आल्याने […]

Continue Reading

क्लबवर छापा; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंसह 51 जणांवर गुन्हा दाखल!

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची कारवाईबीड दि.28: शहरापासून जवळच असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरातील राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या जागेतील जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी (दि.28) रात्री छापा टाकला. यावेळी 48 जुगाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह आलिशान कार, मोबाईल असा 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड […]

Continue Reading

कत्तलखान्यावर छापा; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त!

गोवंशीय प्राण्यांची दिवसाढवळ्या कत्तल; आष्टी पोलीसांची कारवाई बीड दि.26 : आष्टी तालुक्यातील दौलावडगाव परिसरामध्ये कत्तलखान्यावर गोवंशीय प्राण्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती आष्टी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोसावी यांनी इतर सहकार्‍यांच्या मदतीने शनिवारी (दि.25) रात्री कत्तलखान्यावर पंचसमक्ष छापा मारला. यावेळी टेम्पोसह चार वाहने, […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यासाठी कोरोनाची आनंदाची बातमी!

बीड दि.26 : सांभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बीडमध्ये मोबाईल चोरणारा चोरटा पकडला!

आठ मोबाईल केले जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.23 : शहरात दररोज दुचाकी चोरी, मोबाईल चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत. पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीच्या घटनेतील आरोपींचा शोध घेवून जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी (दि.23) सकाळी एका मोबाईल चोरास अटक केली. त्याकडून शहरातच चोरी केलेले आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. […]

Continue Reading