घरासमोर शतपावली करणार्‍या दोन सख्ख्या बहिणींना चिरडले!

पाटोदा तालुक्यातील धनगर दुर्देवी जवळका येथील घटना;पाटोदा दि.20 : घरासमोर शतपावली करत असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव आलेल्या स्कार्पिओने जोराची धडक दिली. या अपघातात दोघींनाही दोनशे फूट अंतर फरफटत नेले. गंभीररित्या जखमी झालेल्या दोन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे रविवारी (दि.19) रात्रीच्या सुमारास घडली. तर अपघातात दोन तरुण […]

Continue Reading
exam paper leak

आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरप्रकार करणारा बीडचा संजय सानप अटकेत

बीड-आरोग्य विभागाच्या परिक्षेत गैरव्यवहार करणारा बीडचा संजय शाहुराव सानप (वय 40 रा. वडझरी ता. पाटोदा) यास पुणे सायबर पोलीसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. आज त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्या घरी धाड मारल्यानंतर पोलीसांना तब्बल दोन कोटी रुपयांचे घबाड […]

Continue Reading

फारूक पटेल यांना दोन वर्षाची शिक्षा

बीड : ६ वर्षांपूर्वीच्या एका वनपालाला झालेल्या मारहाण प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक फारूक पटेल यांच्यासह एकाला बीडच्या प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशांनी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.बीड येथील वनविभागाच्या कार्यालयात २०१५ मध्ये फारूक पटेल यांनी नियंत्रण कक्षाचे कुलूप तोडून भिंत पाडली आणि तत्कालीन वनपाल सखाराम कदम यांना मारहाण केल्याचा गुन्हा बीड शहर […]

Continue Reading

कागदपत्रावर खोटी स्वाक्षरी करुन लिपिकास धमकावले!

एआरटीओ कार्यालयातील प्रकार; बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल बीड दि.17 : येथील उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपकास एकाने वाहनाच्या कागदपत्रावर खोट्या स्वाक्षर्‍या केल्या. सदरील बाब येथील लिपीकाच्या निदर्शनास आल्यानंतर काम होणार नाही असे सांगितले. त्यावर लिपिकास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील लिपीक विक्रमसिंग […]

Continue Reading
corona pecaint suicide

खासगी सावकारकीला कंटाळून वडीलापाठोपाठ मुलाची आत्महत्या

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील घटना मोठेवाडी दि.17 ः खासगी सावकारकीने त्रस्त झालेल्या शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय युवकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.17) सकाळी 6 वाजता तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. वर्षभरापूर्वी सदरील युवकाच्या वडीलांनीही कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. दरम्यान सदरील घटनेने खाजगी सावकारकीने राजेवाडी येथे दोन बळी घेतल्याची चर्चा आहे. ज्ञानेश्वर […]

Continue Reading

पत्नीला गळा दाबून मारले, नंतर स्वतः घेतला गळफास

वैतागवाडी येथील घटनेचा उलगडा काय आहे वैतागवाडी येथील घटनेचा उलगडा इथे क्लिक करा वाचण्यासाठी नेकनूर दि.17 : बीड तालुक्यातील वैतागवाडीमध्ये पती-पत्नीचा मृतदेह घरामध्ये गुरुवारी (दि.17) रोजी आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. शुक्रवार (दि.17) रोजी मृतदेहांचे उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना मिळाला असून, यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर […]

Continue Reading
voter

निवडणूक लांबते की काय? उमदेवारांना प्रचंड टेन्शन!

बीड, दि. 17 : ओबीसी आरक्षाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून जबर झटका बसला. त्यानंतर सरकारने मंत्रिमंडळ ठराव घेऊन 21 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत त्यांना मात्र प्रचंड टेन्शन आले आहे. जर निवडणूक लांबलीच तर आतापर्यंत केलेला सगळा खर्च […]

Continue Reading

वैतागवाडीत नवदाम्पत्याची गळफास घेवून आत्महत्या!

मयत महिला होती सात महिन्याची गर्भवती नेकनूर दि.16 : बीड तालुक्यातील नेकनूर येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये एका नवंदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.16) समोर आली आहे. मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याने खळबळ उडाली असून रात्री उशीरापर्यंत आत्महत्यामागचे कारण समोर आले नव्हते. नेकनूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून […]

Continue Reading

आयपीएस पंकज कुमावत यांचा छापा; 22 जुगारी ताब्यात

बीड दि.16 : सहय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज उपविभागाचा पदभार घेतल्यापासून गुटखा, जुगार, दारु, वाळू अशा विविध अवैध धंद्यांवर कारवाया धडाका सुरुच आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा येथे गुरुवारी (दि.16) दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे मारले. यावेळी 22 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा 7 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading