धीरजकुमारांची बीडमध्ये मटका अड्ड्यावर धाड!

नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्ह नोंदबीड .17 : मागील आठवडाभरापासून जिल्हा पोलीस दल अ‍ॅक्टिव मोडवर दिसत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने अवैध धंद्यावर कारवायांचे सत्र सुरुच आहे. स्थानिक पोलीसांचा अवैध धंद्यांकडे होणारा कानाडोळा पाहता सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, डॉ.धीरजकुमार बच्चू, विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्यासह स्थानिक […]

Continue Reading
areested

माजलगाव शेजुळ हल्ला प्रकरणात चौघांना अटक!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.10 : माजलगावचे भाजपा कार्यकर्ते अशोक शेजूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍या आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आवळल्या आहेत. प्रत्यक्ष हल्ला करणार्‍या पाच आरोपींपैकी चौघांना त्यांच्या घरून आणि हॉटेल लोकसेवा येथूल उचलण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. अविनाश बाबासाहेब गायकवाड (वय 26 रा. पुनंदगाव), संदीप बबन शेळके (वय 22) सुभाष बबन […]

Continue Reading
acb trap

जामीनाच्या मदतीसाठी पोलीस कर्मचार्‍याने मागितले तीन लाख!

एसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्‍याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्‍यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सादिक सिद्दीकी असे लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत […]

Continue Reading
prakash solanke

अशोक शेजुळ हल्ला प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके मंगला सोळंके रामेश्वर तवानी यांच्यावर गुन्हा दाखल

माजलगाव– भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर मंगळवारी धुलीवंदना दिवशी अज्ञात पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉडने शाहूनगर भागात जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अशोक शेजुळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान शेजुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या पत्नी मंगलताई सोळंके आणि रामेश्वर टवानी यांच्यासह इतर पाच […]

Continue Reading
PANGAT

पंगतीला जेवायला वाढले नाही; एकास बेल्टने मारहाण

प्रतिनिधी । अंबाजोगाईदि.25 : लग्नाच्या पंगतीस जेवायला वाढले नसल्याने एकास बेल्टने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील घाटनांदुर येथील शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी ( दि. 24) घडली. या प्रकरणी चौघा विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.तालुक्यातील घाटनांदुर येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या केशव गोपीनाथ मुंडे (रा. कन्हेरवाडी ता. परळी) या तरुणास, तू घरातील लग्न असताना आम्हाला पंगतीला जेवायला […]

Continue Reading

जय महेश कारखान्यातील अपघातात कामगाराचा मृत्यू

माजलगाव दि.21 : तालुक्यातील जय महेश कारखान्यात भुसाच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.21) रात्री 9 घ्या दरम्यान घडली. कल्याण गणपती टोले (वय 40 रा.आनंदगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्यात (शुगर इंडस्ट्री) ते कामगार म्हणून कामाला होते. मंगळवारी कारखान्यात दुरुस्तीचे काम चालू होते. रात्री […]

Continue Reading

चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा पालीच्या धरणात मृतदेह सापडला

नेकनूर दि.10 : बीड तालुक्यातील पाली बिंदुसरा धरणाच्या काठावर नेकनुर येथील तरुणाचे कपडे व आधार कार्ड आढळून आले होते. हा तरुण बिंदुसरा धरणात बुडला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. तीन दिवसाच्या शोध मोहीमनंतर शुक्रवारी (दि.10) मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. केशव भिकाजी काशीद (वय २९ रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका , […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading