रामराव गोविंदराव डक यांचे निधन

माजलगाव दि. 27 : तालुक्यातील सोन्नाथडी येथील प्रगतशील शेतकरी असणारे रामराव गोविंदराव डक यांचे रविवारी (दि. 27) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर येथील मंगलनाथ स्मशानभूमी मध्ये सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार गोविंदराव डक यांचे ते […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.21 : सातबारा, आठ अ, फेरफार उतारा आदी कागदपत्रांसाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती 500 रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी शिरुर तालुक्यातील एका तलाठ्यावर सोमवारी (दि.21) बीड एसीबीने कारवाई केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नामदेव राजेंद्र पाखरे (वय 36) असे लाचखोर तलाठ्याचे […]

Continue Reading

वाशी परिसरात कारची काच फोडून बीड येथील दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला!

बीड दि.20 : बीड येथे वास्तव्यास असलेले बडे दाम्पत्य काही कामानिमित्त सोलापूरला गेले होते. तेथून बीडकडे येत असताना त्यांच्या इनोव्हा कारवर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाशी परिसरात अचानक 15 ते 20 जणांनी सशस्त्र हल्ला चढवला. गाडीचा काच फोडून बडे दाम्पत्यास गाडीच्या बाहेर काढून मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील नगदी रोकडसह सोने-चांदीचे दागिने लुटले. यावेळी रस्त्यावरुन जाणार्‍या […]

Continue Reading

केजच्या मुकादमाचे शीर धडावेगळे करुन हिरण्यकेशी नदीत फेकले!

अपहरणकर्त्यांनी सुटकेसाठी केली होती 12 लाख रुपयांची मागणी ;तिघे ताब्यात केज दि.15 ः तालुक्यातील लव्हरी येथील ऊसतोड मुकादम सुधाकर चाळक यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना मारहाण करत त्यांच्या मुलांकडे सुटका करण्यासाठी 12 लाख रुपयांची मागणी केली जात होती. पैसे न दिल्यास कापून टाकू अशी धमकी देण्यात आली होती. अखेर या अपहरणकर्त्यांनी नियोजित कट रचून […]

Continue Reading