ACB TRAP

लाच मागणारा फौजदार एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.11 : तक्रारदाराचा गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल, तसेच आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती 40 हजार रुपयांची स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले. या प्रकरणी उपनिरीक्षकावर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) बीड एसीबीने केली. “ अफरोज तैमीरखा […]

Continue Reading
MURDER

अंबाजोगाईत तालुक्यातील साकूड पाठोपाठ गडदेवाडीतही एकाचा खून!

घटनास्थळी वरिष्ठ पोलीसांची भेटअंबाजोगाई दि.10 : अंबाजोगाई तालुक्यातील साकूड येथे काल खुनाचा घटना घडली होती. त्यानंतर आज गुरुवारी (दि.10) पुन्हा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील गडदेवाडी शिवारात रस्त्यालगत हा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सुनिल जायभाये यांनी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी स्वारातीमध्ये दाखल केला आहे. मृतदेहाच्या चेहर्‍यावरील जखमा पाहता खून […]

Continue Reading
crime

मस्जीदची जमीन हडपणार्‍या तात्कालीन उपजिल्हाधिकारी बोधवडवर गुन्हा दाखल!

दिंद्रूड पोलीस ठाण्यात दहा जणांवर गुन्हा बीड दि.8 ः माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे मस्जिदची वक्फ बोर्डाच्या ताब्यातील 44 एकर 8 गुंठे जमीन बेकायदेशीरपणे स्वतःच्या नावे केली. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस ठाण्यात जिल्हा वक्फ बोर्ड अधिकार्‍याच्या फिर्यादीवरुन मंगळवारी (दि.8) तात्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह दहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवस्थान, मस्जिदच्या जमीनी बेकायदेशीरित्या हडपण्याचे प्रकार जिल्ह्यात […]

Continue Reading

गोळीबार प्रकरण; रवींद्र क्षीरसागर यांना अंतरिम जामीन!

बीडः दि.8 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून गोळीबार प्रकरण घडले होते. याप्रकरणी रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर अर्जुन क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दरोड्यासह प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रविंद्र क्षीरसागर यांनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात […]

Continue Reading

कार झाडावर आदळली; मंडळाधिकारी जाधव यांचा मृत्यू तर तहसीलदार जखमी

गेवराई दि.6 : अवैध वाळू वाहतूक विरोधात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील अधिकाऱ्यांच्या कारचा अपघात झाला. यामध्ये मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास राक्षसभूवन रोडवरील सावळेश्वर फाटा येथे घडला. महसूल विभागाचे पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात गोदापात्रात […]

Continue Reading