ACB TRAP

महावितरण उपव्यवस्थापक बेडेकरला एसीबीचा झटका!

दहा हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले बीड दि.6 : चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी तक्रारदारास 11 हजार रुपयांच्या लाचेची राज्य विद्यूत विरतण कंपनीच्या उपव्यवस्थापकाने मागणी केली होती. तडजोडअंती 10 हजार रुपायांची लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 6 जुलै उपव्यवस्थापकास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुपाळ मधुकर बेडेकर (वय 51 […]

Continue Reading
marhan, hanamari,

एकादशीला माळकरी आईला मटन करून दे म्हणत खून करणार्‍या मुलाचा मृत्यू

राहुरी, दि. 3 : राहुरीच्या कारागृहात खुनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचे मूत्रपिंडाच्या आजाराने काल शुक्रवारी (दि.2) रात्री दहा वाजता निधन झाले. त्याला रात्री पोटात दुखायला लागल्याने तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. राजेंद्र गोविंद लांडे (वय 46, रा. तांभेरे, ता. राहुरी) असे […]

Continue Reading
ACB TRAP

महावितरणच्या कनिष्ठ लिपीकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

परळी दि.1 : वीजबिल भरणा नियमित केल्यानंतरही बिलावर थकबाकी दिसते, व्यावसायिक मिटरचा प्रकार असताना औद्योगिक वीजाकारणी होणे आदी तांत्रिक बाबी पुर्ण करून वीजबिलाचे दुरुस्तीचे वरिष्ठांकडून काम करुन देण्यासाठी तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. ती स्विकारतान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून परळी महावितरण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक व एक खाजगी एजंटवर गुरुवारी (दि.1) कारवाई केली. परळी […]

Continue Reading

अपघात भासवण्याचा प्रयत्न फसला, मारेकरी मेहुण्यासह दोघे गजाआड

नेकनूर दि.30 : मांजरसुंबा घाटात मंगळवारी सकाळी बुलेटवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मात्र हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. यातील मुख्य आरोपी मयताचा मेहुण्यासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपघाताचा केलेला बनाव फसला असून 24 तासात नेकनूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

Continue Reading

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचे बीड कनेक्शन!

बीड दि.29 : देशात, राज्यात मोठी घटना घडली की, त्यामध्ये बीडचे काही ना काही कनेक्शन नक्की समोर येते. उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाचं बीड कनेक्शन आता समोर आलेलं आहे. धर्मांतर प्रकरणी अटकेत असलेला इरफान शेख बीड जिल्ह्यातील सिरसाळा येथील असल्याचं समजत आहे. याप्रकरणी इरफान शेखसह इतर आरोपींना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. या घटनेने बीड […]

Continue Reading
accident

दुचाकींचा समोरासमोर अपघात; चौघे जखमी

बीड दि.29: दोन दुचाकींचा सामोरासमोर झालेल्या अपघातात चोघे जखमी झाले आहेत. हा अपघात धुळे-सोलापूर महामार्गावरील महालक्ष्मी चौकात मंगळवारी (दि.29) सकाळी 11 च्या सुमारास घडला. या अपघातामध्ये दोन तरुण, एक महिला व मुलगा जखमी झाला आहे. येथील फारुख शेख, अशोक सुरवसे, विलास ढेरे यांनी तात्काळ जखमीना उपचारासाठी बीडमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. महालक्ष्मी चौकामध्ये सतत […]

Continue Reading

मांजरसुंबा घाटात तरुणाचा घातपात?

नेकनूर दि. 29 : येथील मांजरसुंबा घाटात बुलटेवर पडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि.29) मृतदेह आढळून आला. तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम असून हा घात आहे की, अपघात याचा तपास पोलीस करत आहे. घटनास्थळी नेकनूर व बीड ग्रामीणचे पोलीस दाखल झाले आहेत. निलेश ढास (वय 27 रा.लिंबागणेश ता.बीड) या तरुणाचा मांजरसुंबा घाटात मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात […]

Continue Reading
anil deshmukh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरी ‘ईडी’चे छापे

नागपूर, दि.25 : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकार्‍यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख […]

Continue Reading
MURDER

बीड तालुक्यात पोलीस पाटलाचा खून!

बीड : दि.24 बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.24) रात्री 10 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत. भिमराव ससाणे (वय 50 रा.मानखुरवाडी ता.जि.बीड ह.मु.ढेकणमोहा) असे मयताचे नाव आहे. ते पोलीस पाटील आहेत. ढेकणमोहा फाट्यावर त्यांच्या डोक्यात खोर्‍याने वार […]

Continue Reading

सिरसाळा ठाण्यात एसीबीची कारवाई

सिरसाळा दि.23 : राखेची वाहतूक करण्यासाठी तीन टिप्पर चालू देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच खाजगी इसमामार्फत स्विकारली. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.23) दुपारी उस्मानाबादच्या एसीबीने केली. उमेश यशवंत कनकावार, गजानन अशोक येरडलावर (दोघे पोलीस शिपाई नियुक्ती सिरसाळा पोलीस स्टेशन) व खाजगी इसम नदीम […]

Continue Reading