वैद्यनाथ साखर कारखान्यात राडा!

कार्यकारी संचालकाच्या अंगरक्षकास मारहाण परळी दि.10 : माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये पागरीच्या कारणावरुन कर्मचार्‍यांनी राडा केला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या अंगरक्षकास मारहाण करण्यात आली असून त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चंद्रमणी तरकसे आणि रवींद्र वैद्य असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे. ते परळी शहरातील राहवाशी असल्याचे सांगण्यात आले […]

Continue Reading

परिवर्तनचे आणखी दोन आरोपी गजाआड

माजलगाव दि.9 : येथील ‘परिवर्तन’ मल्टीस्टेच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा मुख्य आरोपी विजय आलझेंडे हा मंगळवारी (दि.9) माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (दि.10) आणखी दोघांना गजाआड केले आहे. संजय बाबूलाल शर्मा (वय 52 रा.माजलगाव) व बालाजी मधुकरराव पानपट (वय -39 रा.माजलगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. संजय […]

Continue Reading

शेतात लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू

पैठण दि.9 : शेतातील गव्हाच्या पीकाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍याचा करंट बसून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.9) दुपारी पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात घडली. पैठण तालुक्यातील ईसारवाडी परिसरात मंगळवारी दुपारी संतोष कडुबाळ चाबुकस्वार (वय 30 रा.पिंपळवाडी) या तरुण शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. ही आग विझवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना शेतामध्ये महावितरण […]

Continue Reading

50 कोटीच्या घोटाळ्यातील विजय आलझेंडे न्यायालयात शरण

 माजलगाव दि.9 : येथील ‘परिवर्तन’ मल्टीस्टेच्या माध्यमातून ठेवीदारांना कोट्यावधींचा गंडा घालणारा मुख्य आरोपी विजय आलझेंडे अखेर मंगळवारी (दि.9) माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. विजय आलझेंडेवर गैरव्यवहार प्रकरणी 11 गुन्हे दाखल आहेत. मागील अडीच वर्षापासून आलझेंडे पोलीसांना गुंगारा देत होता. विजय आलझेंडेवर परिवर्तन मल्टीस्टेट मधील सुमारे 50 कोटीच्या घोटाळयात 11 गुन्हे दाखल आहेत. सुरुवातील शिक्षक त्यानंतर नगरसेवक […]

Continue Reading

स्टीलचे दुकान फोडले; चार लाखांचा माल लंपास

बीड दि.9 : शहरातील बार्शी रोडवर असलेल्या एका स्टील दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील पितळी भांडे लंपास केली आहेत. या भाड्यांची किंमत अंदाजे चार लाखापर्यंत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मच्याऱ्याचा मृत्यू

बीड दि. 9 : रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास […]

Continue Reading

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून!

माजलगाव दि.8 : तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किरायावरून दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवार (दि.8) रोजी मोठ्या भांडणात झाले. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे प्लॉटच्या किरायाचा वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून वाद सुरु होता. सोमवारी […]

Continue Reading