attack on press reporter

पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण

व्हीडिओ झाला व्हायरल गुवाहटी -भूमाफीयांच्या विरोधात बातमी दिली म्हणून एका पत्रकाराला विजेच्या खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आसाममधील प्रतिदिन नावाच्या दैनिकाचा हा पत्रकार आहे.मिलन महंता रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या एका दुकानापाशी थांबलेले असताना काही जणांनी त्यांना अचानक घेरलं. त्यानंतर त्यांना विजेच्या खांबाला बांधून मारहाण […]

Continue Reading
crime

बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला

गेवराई  दि.18 : गेवराई शहरातून दोन तीन दिवसापूर्वी एक 16 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. बुधवारी (दि.18) सकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सायली कल्याण पारेकर (वय 16 रा.गणेशनगर, गेवराई) असे मुलीचे नाव आहे. ती गेवराई शहरातून बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसापुर्वी गेवराई शहर […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू

पैठण तालुक्यात भीतीचे वातावरण पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत. अशोक मखाराम […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पिता-पुत्र ठार

अपेगवतील घटनेने शेतकरी दहशतीखाली पैठण, (चंद्रकांत अंबिलवादे) दि.17- पैठण तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला असून शेती वस्तीवर काम करण्यासाठी मोल मजूर व शेतकऱ्यांना दहशतीखाली काम करावे लागत असतानाच सोमवारी रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करणारे पिता पुत्रावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याने यामध्ये पिता-पुत्र ठार झाल्याची घटना घडले आहे त्यामुळे ग्रामीण […]

Continue Reading
arrested criminal corona positive

अ‍ॅसिड हल्ला : नराधमास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

 नेकनूर  दि.15 : दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्‍या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली होती. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना रविवारी पहाटे तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी आरोपी अविनाश राजुरेला देगलूर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. अविनाश रामकिसन राजुरे […]

Continue Reading
acid halla neknoor

अ‍ॅसिड हल्ला झालेल्या ‘त्या’ पीडितेचा दुर्दैवी मृत्यू

बीडमधील धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला नेकनूर, दि.15 : पुण्याहून गावाकडे परतत असताना प्रियकराने आपल्या प्रेसयीवर अ‍ॅसिड हल्ला करून तिच्यावर पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रकार ऐन लक्ष्मीपुजनादिवशी पहाटे घडला होता. तब्बल बारा तासानंतर पीडितेच्या विव्हळण्याने आजुबाजुच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज या पीडितेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेने अख्खा […]

Continue Reading

मासे पकडण्यासाठी गेलेल्या चुलत्या, पुतण्याचा शॉक बसल्याने दुर्दैवी मृत्यू

धारूर: नदीच्या डोहात सोडलेला विजेचा शॉक लागून दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारूर तालूक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली. समाधान सहदेव रुपनर ( वय21) आणि दिपक मारूती रुपनर ( वय19 )अशी मृतांची नावे असून ते नात्याने चुलते-पुतणे होते. गुरुवारी सांयकाळी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. सायंकाळी गावापासून एक कि.मी असणाऱ्या नदीच्या […]

Continue Reading

बेपत्ता शिक्षकाचा पालीच्या धरणात मृतदेह आढळला

बीड दि.12  गेवराई येथील बेपत्ता जिल्हा परिषद शिक्षकाचा मृतदेह पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये गुरुवारी (दि.12) दुपारी आढळून आला. सदरील मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला आहे. बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी धाव घेत नपच्या बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर सदरील […]

Continue Reading

सिंदफना नदीत आढळला कुजलेला मृतदेह

बीड  दि.12 : सिंदफना नदीपात्रातील एका झाडावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. शिरुर तालुक्यातील हाजीपूर परिसरामध्ये सिंदफना नदीतपात्रात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह चकलांबा पोलीसांना आढळून आला. या प्रकरणी चकलांबा पोलीसांनी तपास केल्यानंतर शिरुर पोलीस ठाण्यामध्ये मिसींग दाखल आहे. […]

Continue Reading

बीडमधील एसटी चालकाने रत्नागिरीत केली आत्महत्या

बीड दि.9  : प्रलंबित वेतनासाठी सोमवारी (दि.9) प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत आक्रोश आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन, एसटी कामगार संघटनांनी केले होते. याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या केली आहे. हा कर्मचारी बीड जिल्ह्यातील असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पांडुरंग गडदे (रा.बीड) असे एसटी चालकाचे नाव आहे. […]

Continue Reading