accident

दोन वेगवेगळ्या अपघातात 4 ठार

ट्रॅक्टर दुचाकीच्या धडकेत दोन ठार नेकनूर : भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅक्टरने समोरून येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास सात्रापोत्रा रस्त्यावर घडली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सुभाष गोविंदराव घोडके व बिभीषण दत्तू पोकळे (रा.दोघेही पोत्रा) हे रात्री आठच्या सुमारास आपली […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू

बीड : पोहण्यासाठी गेलेल्या एका एका बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.20) सकाळी समोर आली.समर्थ कल्याण मिसाळ (वय 12) हा शाळकरी मुलगा गावालगत असलेल्या एका विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. या वेळी त्याचा बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज आहे.रात्री उशिरापर्यंत समर्थ घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी मृतदेहाचा शोध घेणे सुरु केले.गुरुवारी सकाळी अग्निशामक […]

Continue Reading
chori, gharfodi

आष्टी येथील जैन मंदिरात चोरी

आष्टी, दि.19 : येथील श्री चंद्रप्रभु दिंगबर जैन मंदिरात बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असून यामध्ये पितळाच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या असल्याची लेखी तक्रार जैन संघटनेचे अध्यक्ष सुनील पंढरे यांनी येथील ठाण्यात दिली.शहरातील तेली गल्ली लगत असलेल्या जैन मंदिरात साडे चारशे वर्षापूर्वीची भगवान महावीर यांची पितळेची ऐतिहासिक मुर्ती होती. हीच मुर्ती चोरी गेली […]

Continue Reading
bidkin attacked landaga

लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

30 मेंढ्यांचा मृत्यू; 15 जखमी पैठण दि.19 : पैठण तालुक्यातील बिडकीनजवळ पेट्रोल पंपाच्या समोर गायरान जमिनीवर मेंढपाळाच्या कळपावर मंगळवार मध्यरात्री लांडग्यांनी अचानक हल्ला केला. यात तीस मेंढ्याचा मृत्यू झाला तर पंधरा मेंढ्या जखमी झाल्या आहेत. जखमी मेंढ्या सुद्धा दगावण्याची शक्यता तालुका पशुवैद्यकीय अधिकारी वर्तवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पैठण- औरंगाबाद रोडवरील बिडकीन […]

Continue Reading
gharfodi, chori

गेवराईत घरफोडी

गेवराई, दि.17 : शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करून साडेबारा हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात ज्ञानेश्वर खाडे हे वास्तव्यास आहेत. रविवारी ते घर बंद […]

Continue Reading
POLICE FITING

कंटेनमेंट झोन काढा म्हणत होमगार्डला धक्काबुक्की; आरोपी निघाला पॉझिटिव्ह

अंबाजोगाई, दि.17 : अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाकडून त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला. त्यासाठी बॅरिकेटस लावून प्रवेश निषिध्द करण्यात आला. शिवाय एक पोलीस कर्मचारी, शिक्षक व इतरांच्या त्या ठिकाणी ड्यूट्या देखील लावण्यात आल्या. मात्र अशाच ड्यूटीवरील एका होमगार्डला कंटेन्मेंट झोनमधील पिता-पुत्रांनी मारहाण केल्याचा प्रकार 15 ऑगस्टला घडला. […]

Continue Reading
CHEDCHHAD, ASHLIL CHALE, VINAYBHANG

विकृती : प्रातःविधीसाठी जाणार्‍या अल्पवयीन मुलीसोबत अश्ल्लिल चाळे

उपळी गावातील तीन नराधमांचा कृत्य वडवणी दि.16 : नराधमांनी सध्या मोठाच उच्छाद मांडला आहे. दोनच दिवसापुर्वी पाटोदा येथे तलावावर गेलेल्या एकट्या महिलेला गाठून अत्याचाराची घटना घडली असताना आज पुन्हा बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील उपळी येथेही नराधमांची विकृती उफाळून आली. येथे प्रातःविधीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीला तिघा नराधमांनी अडवून जवळच असलेल्या विटभट्टीच्या खोलीत नेले आणि तिथे […]

Continue Reading
shwan pathak

पाचोड ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री तीन दुकाने फोडली; मेंढपाळच्या 22 मेंढ्या चोरीला; पोलीस चौकीवर फिर्याद घेण्यास नकार पैठण, दि.16 : तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विहामांडवा आणि आडूळ परिसरात शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत आडूळ येथील एका डॉक्टरच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेल्या विहामांडवा गावात तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. सोबतच […]

Continue Reading