crime

महिला तलाठ्यासोबत हुज्जत, एकावर गुन्हा दाखल

अंबाजोगाई : मला कार्यालयात का येऊ देत नाही म्हणत महिला तलाठ्याशी हुज्जत घालून त्यांच्या हातातील सातबाराचे रजिस्टर फाडून टाकले. तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना अंबाजोगाई शहरात मंगळवारी (दि.23) दुपारी घडली. या प्रकरणी महिला तलाठी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माया प्रभू चव्हाण या साकुड सज्जाच्या तलाठी आहेत. […]

Continue Reading
bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे […]

Continue Reading
tractor

टॅ्रक्टरखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना  गेवराई : चुलता ट्रॅक्टर चालवित आसताना, बाजूला बसलेल्या पुतण्याचा अचानक तोल गेल्याने सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच ट्रॅक्टरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील लुखामसला येथे शुक्रवारी दि.26 रोजी सकाळी घडली. घटनेने गावावर शोककळा पसरली असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील […]

Continue Reading
accident

स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी

राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना माजलगाव :  राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली. तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय […]

Continue Reading
maheboob shekh

शिरुर पोलीसात आ.गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दिली फिर्याद बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार यांच्याबद्दल आ.गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात आ.परळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेबुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले […]

Continue Reading
crime

मॅसेज, कॉलच्या त्रासाला कंटाळून नर्सिंगच्या विद्यार्थीनीची आत्महत्या 

परळी :  एक युवक सातत्याने मोबाईलवर फोन करून त्रास देत असल्याने शहरातील जगतकर गल्ली (भिमनगर) येथील 24 वर्षीय नर्सिंग करणार्‍या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे 12 जून रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जून रोजी तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूरबंगला भागातील उस्मान लतीफ शेख (वय-24) या युवकाविरोधात […]

Continue Reading
GIRL BURNT

निंदनीय कृत्याने देश हादरला, विरोध केला म्हणुन 14 वर्षीय मुलीला जीवंत जाळले

बलात्काराला विरोध केला म्हणून केले असे कृत्य बेमेतारा (छत्तीसगड) ः देशामध्ये वरचेवर महिलांवरील अत्याचार, बलात्कार असे निंदनीय प्रकार घडत असताना पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. सातवीच्या वर्गात शिकणार्‍या एका 14 वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न यशस्वी होऊ न दिल्याने तिच्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमधील बेमेतोरा येथे घडला आहे. […]

Continue Reading
ashit khun

बापच निघाला मुलाचा खूनी

अंभोरा पोलीसांनी काही तासातच केला खुनाचा उलगडा बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळखेड येथे खुनाची घटना मंगळवारी (दि.23) दुपारच्या सुमारास घडली होती. अंभोरा पोलीसांनी काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला असून बापानेच मुलाचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 […]

Continue Reading
MURDER

धारदार शस्त्राने तरुणाचा खून

अज्ञातावर खूनाचा गुन्हा दाखल आष्टी :  तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रामदास पांडुरंग चव्हाण (वय 35 रा.पिंपळखेड ता.आष्टी जि.बीड) असे मयताचे नाव आहे. पिंपळखेड येथील त्यांच्या शेतात गोठ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची […]

Continue Reading