supreme courte

कर्ज हप्ते भरण्याचा कालावधी 2 वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो

केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती नवी दिल्ली, दि.1 : कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार (मोरॅटोरियम) कालावधी दोन वर्ष पुढे वाढवला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिली. त्यामुळे लॉकडाऊनमुळे आर्थिक डबघाईला आलेल्या उद्योग-धंदे, व्यवसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. सदरील माहितीसाठी केंद्राकडून आरबीआयच्या एका अध्यादेशाचा आधार घेण्यात आला आहे. मात्र हा कालावधी वाढवताना […]

Continue Reading
indian rangade

पुर्वलडाखमध्ये युध्दजन्य स्थिती; दोन्ही देशांचे रणगाडे आमने-सामने

नवी दिल्ली, दि.1 : भारत आणि चीनमध्ये सद्य स्थितीत तणाव प्रचंड वाढला आहे. दोन्ही देशाचे रणगाडे ऐकमेकांच्या आमनेसामने फायरिंग रेंजमध्ये उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे सीमेवर कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर हा तणाव निर्माण झाला आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार चीनने घुसखोरी […]

Continue Reading

जिल्हाबंदी उठली, हॉटेल्स, लॉज सुरु..

अनलॉक-4 संदर्भात नियमावली जाहिर मुंबई : अनलॉक-4 संदर्भात नियमावली जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये खाजगी बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ई-पास शिवाय राज्यात प्रवास करण्यात येणार आहे. तसेच निवासी हॉटेल्स, लॉज सुरु राहणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र जिम, मेेट्रो, चित्रपटगृह तुर्तास बंदच राहणार असल्याची माहिती आहे. 30 सप्टेेंबर पर्यंत […]

Continue Reading

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

मुलगा अभिजीत यांनी ट्विटरवरुन दिली माहिती मुंबई  : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी (दि.31) सायंकाळी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना […]

Continue Reading

नरेंद्र मोदी यांनी बीडचा श्वान रॉकीचे केले कौतूक

बीड  : बीडसह जिल्ह्याबाहेर जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये बोलतांना म्हटले […]

Continue Reading
corona vaccine

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे. सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे […]

Continue Reading
tabligi jamat

तबलिगी जमात फंडिंग प्रकरणात ‘ईडी’चे 20 ठिकाणी छापे

नवी दिल्ली: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात दिल्लीतून तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे कोरोना देशभर पसरला असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांच्या सह केंद्रातील इतर मंत्र्यांनी केला होता. तेव्हापासून मोदी सरकार तबलिगी जमातीला कुठून फंडिंग होते याचा शोध घेत आहे. आता ईडीने याच प्रकरणात मुंबईसह 20 ठिकाणी छापे मारले आहेत. दिल्लीत सात ठिकाणी, मुंबईत पाच ठिकाणी, हैदराबादेत चार ठिकाणी […]

Continue Reading
sushant singh rajput and riya chakraborti

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे – सर्वोच्च न्यायालय

दिल्ली: सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी वांद्र्याच्या त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूला आत्महत्या समजून अनेक तपास झाले; मात्र त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केल्यापासून या प्रकरणाला वेगळे वळण आले. आज सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात मुंबई पोलीस कि पाटणा पोलीस हा वाद बाजूला सारत, सीबीआय […]

Continue Reading
corona vaccine

रशिया पाठोपाठ चीन कडून कोरोनावरील लसीची घोषणा

फेज ३ चाचणीच्या निष्कर्षांची वाट न पाहता परवानगी मिळाल्याने चीनची व्यावसायिक मानसिकता जगापुढे वुहान : वुहान मध्ये कोरोनाचा जन्म, पूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात, लाखो मृत्यू, अनेक कोरोनाग्रस्त, जागतिक व्यवसाय ठप्प, दळणवळण ठप्प, या सगळ्या घडामोडींचे श्रेय फक्त आणि फक्त चीनला जाते. मुळात पहिल्या प्रथम कोरोनाविषयी माहिती लपविल्याने चीन जागतिक स्तरावर आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. अशातच रशियाने […]

Continue Reading