सोन्यासाठी सोनाराचा केला प्रिप्लॅन मर्डर!

स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीसांना प्रकरणाचा लावला छडा बीड दि.23 ः ‘माझं नविन लग्न झालं आहे. घाईगडबडीत सोने खरेदी करायचे राहून गेले.’ असं सांगत एका सराफाला सोन्याची ऑर्डर दिली. दागिणे घेऊन त्यास बोलावून घेतले. सलुनच्या दुकानात कोंडून त्याकडून दागिणे घेत त्याची निर्घणपणे हत्या केली. त्यानंतर मित्राच्या मदतीने दुचाकीवरुन त्याचा मृतदेह परजिल्ह्यात नेऊन शेतात पुरून […]

Continue Reading

बीड शहरात 57 बॉक्स देशी दारु जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे. […]

Continue Reading

डीवायएसपी सुधीर खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे एसीबीची कारवाई बीड दि.20 : अ‍ॅट्रोसिटीच्या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी पाच लाखाची लाच मागून दोन लाख रुपये स्वीकारल्या प्रकरणी जालन्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर आणि इतर दोन पोलीस कर्मचार्‍यांना पुणे आणि औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि.20) सकाळी करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदारास […]

Continue Reading

दादा मुंडेंची काँग्रेसमधून हकालपट्टी!

बीड :- काँगेसचे पदाधिकारी दादा मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सोशल मीडियावर अपशब्दात भाष्य केले होते. यामुळे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हिंगोली जिल्हा प्रभारी दादा मुंडे यांची काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेस पक्षाची भूमिका विचारात न घेता, […]

Continue Reading
mahatma phule jan arogya yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असतानाही बील आकारणार्‍यांकडून होणार वसुली

ओमप्रकाश शेटे यांच्या याचिकेवर हायकोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत रुग्णालयाने पैसे घेतले असतील तर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करण्याचे शेटे यांचे अवाहन बालाजी मारगुडे । बीड बीड- राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करावी, म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 7 मे रोजी […]

Continue Reading
remdesivir

रेमडिसीवीरचा काळाबाजार करणार्‍या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.27 : जिल्ह्यात रेमडेसिविरचा तुटवडा असताना आणि एका इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाइक भटकत असताना दुसरीकडे काळाबाजार जोरात सुरू आहे. चक्क 22 हजार रुपयांना एक इंजेक्शन विकण्याचा प्रकार 23 एप्रिल रोजी रात्री बीडमध्ये समोर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांनी 27 एप्रिल रोजी जामीनासाठी […]

Continue Reading

वैद्यकिय किंवा अतिमहत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी असा काढा पास

बीड दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिमहत्वाचे कामासाठी अथवा वैद्यकिय उपचाराकरीता बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासाकरीता ई-पासची आवश्यकता आहे. हा ई-पास काढण्यासाठी प्रशासनाने एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन पोर्टलवर […]

Continue Reading
anil deshmukh, parambir sing

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी प्रकरणात सीबीआयकडून गुन्हा नोंद

मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. खंडणी प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणार्‍या घरांवर सीबीआयने छापेमारी […]

Continue Reading

22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!

बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर […]

Continue Reading