collector jagtap

15 मे पासून पुन्हा दहा दिवसांसाठी कडक निर्बंध

जिल्हाधिकार्‍यांचे नवीन आदेश बीड दि.13 : पाच दिवसाच्या कडक लॉकडाऊननंतर पुन्हा पुढे दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. 15 मे रोजी रात्री 12 वा.पासून म्हणजेच 16 मे पासून 25 मे रोजी रात्री 12 वा.पर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. गुरुवारी (दि.13) जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार, 1. दिनांक 15 मे 2021 […]

Continue Reading

रमजान ईदनिमित्त बीड शहरात दुधाचे टँकर दाखल

बीड दि.13 : रमजान ईदच्या अनुषंगाने शहरातील मुख्य चौकामध्ये प्रशासनाच्यावतीने दुधाच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली होती. गुरुवारी (दि.13) सायंकाळी 5 च्या सुमारास सामाजिक बांधिलकेतून माऊली एजन्सीच्यावतीने शहरातील कारंजा, तकीया मस्जिद शहेंशहा नगर, मोमीनपुरा परिसरामध्ये अल्पदरामध्ये दुध विक्री सुरु करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. रमजान ईदच्या अनुषंगाने दुध […]

Continue Reading

दादा मुंडेंची काँग्रेसमधून हकालपट्टी!

बीड :- काँगेसचे पदाधिकारी दादा मुंडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सोशल मीडियावर अपशब्दात भाष्य केले होते. यामुळे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हिंगोली जिल्हा प्रभारी दादा मुंडे यांची काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेस पक्षाची भूमिका विचारात न घेता, […]

Continue Reading
corona virus

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक!

बीड दि.27 : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आता कोरोनाचा उद्रेक हा ग्रामीण भागामध्ये पहायला मिळत आहे. बुधवारी (दि.12) जिल्ह्यात 1 हजार 270 कोरोना बाधित आढळून आले. आरोग्य विभागाला बुधवारी (दि.12) चार हजार 288 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 270 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 18 जण निगेटिव्ह […]

Continue Reading
accident

कर्तव्यावर असलेल्या महामार्ग पोलीस कर्मचार्‍यास पिकअपने उडवले

 बीड दि.11 : भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत महामार्ग पोलीस कर्मचारी हे गंभीररित्या जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.11) रात्री 7 च्या सुमारास चौसाळा परिसरात राष्ट्रीय महामार्गावर घडली. त्यांना उपचारासाठी बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूूूदाम वनवे असे पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. मंगळवारी ते कर्तव्यावर होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा परिसरात वाहनांवर कारवाई […]

Continue Reading
corona virus

आज कोरोना हजारपार

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज मंगळवार (दि.11) रोजी १ हजार 2 रुग्ण 58 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4482 नमुन्यापैकी 3224 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 188, आष्टी 140 , बीड 310, धारूर 77, केज 128 , गेवराई 75, माजलगाव 88, […]

Continue Reading

आज 1 हजार 217 कोरोनामुक्त

बीड दि.10 : कोरोना बाधितांचा आकडा हजारपार असला तरी कोरोनामुक्त होणारांचा आकडाही हजारपार आहे. सोमवारी 1 हजार 217 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर सोमवारी (दि.10) 1 हजार 295 कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत कोरोनाने 1 हजार 160 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयामध्ये 6 हजार 573 […]

Continue Reading
corona virus

बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह

बीड दि.10 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. आज सोमवारी (दि.10) 1 हजार 295 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4 हजार 241 नमुन्यापैकी 2 हजार 946 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात 165, आष्टी 77, बीड 304, धारूर 133, केज 215, […]

Continue Reading