22 हजारांना रेमडिसीवीर विकताना दोन तरुण पकडले!

बीड दि.23 : तब्बल 22 हजार रुपयांना रेमडिसीवीर इंजेक्शन विकताना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्शन परिसरात शुक्रवारी (दि.23) रात्री दोन तरुणांना पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकास एका मेडिकल चालकाने इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले. तब्बल 22 हजार रुपयांना इंजेक्शन देताना शिवाजीनगर […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा चिंताजनक!

बीड दि.23 : कोरोना बाधितांचा आकडा मागील दोन चार दिवसातील आकडेवारी पेक्षा आणखी वाढला आहे. लॉकडाऊन असतानाही शुक्रवारी (दि.23) जिल्ह्यात एक हजार 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.23) तीन हजार 971 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 210 जण बाधित आढळून आले असून दोन हजार 761 जण निगेटिव्ह आले […]

Continue Reading
remdesivir

रेमडेसिवरसाठी कोविड सेंटरखाली रांगा लावून बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना कोरोना वाढवायचाय

बीड दि. 23 : संपर्क कमी करा, सोशल डिस्टंन्स ठेवा, मास्क वापरा असे कितीही सांगितले तरी लोकांना विविध कारणांमुळे हे नियम पाळणे होत नाही. त्यात जिल्हाधिकारी प्रत्येक गोष्टीत रांगा लावण्याचे आदेश काढत असतील तर कोरोना कसा कमी होणार? बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर मिळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आगोदर कागदं सबमीट करून रजिस्ट्रेशन करण्याची पध्दत अवलंबिली आहे. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी […]

Continue Reading
corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढला!

बीड  दि.22 : कोरोना बाधितांना बेड मिळत नाहीत. एवढी परिस्थिती गंभीर असतानाही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. गुरुवारी (दि.22) जिल्ह्यात 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.      आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.22) चार हजार 690 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 145 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 545 जण […]

Continue Reading
amar naikwade faruk patel

कलेक्टर साहेब, डोईफोडे कडून होणारा रेमडेसिवीर काळाबाजार रोखा, नसता आम्ही कायदा हातात घेऊ!- पटेल, नाईकवाडे

सर्वसामान्यांच्या जीवांशी खेळणार्‍या डोईफोडेला बदलून दुसर्‍या अधिकार्‍याची नेमणूक करा बीड – बीड शहरात जो रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळा बाजार सुरू आहे, तो ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संमतीने व सहकार्याने सुरू आहे. आठ दिवसापूर्वी याबाबत आम्ही आपल्याकडे तक्रार दाखल केली होती. ज्या दिवशी तक्रार दाखल केली त्याच दिवशी संध्याकाळी ड्रग इंस्पेक्टर डोईफोडे यांच्या संगनमताने लाइफलाइन मेडिको येथून […]

Continue Reading
collector jagtap

आजपासून लागू होणार्‍या लॉकडाऊनबाबात बीड जिल्हा प्रशासानाकडून गाईडलाईन जारी

बीड- आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात लॉकडाऊन राहणार आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या असून त्यात अत्यंत कडक निर्बंध आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थितींसह, खासगी कार्यालयातील उपस्थिती, लग्न समारंभ, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक, खासगी प्रवाशी वाहतूक, आंतरजिल्हा प्रवास आणि कोरोना चाचण्या या अनुषंगाने नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवा (उदा.किराणा […]

Continue Reading
beed lock down

राज्यात गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर

मुंबई, दि. 21 : कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

Continue Reading