कन्हैय्या हॉटेलमध्ये विवाह ; वधुवरासह 300 जणांवर गुन्हा

नेकनूर दि.7 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच सर्वत्र जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे असताना बीड तालुक्यातील कन्हैय्या हॉटेल येथे मोठ्या जल्लोषात विवाह सोहळा संपन्न झाला. याची माहिती पोलीस प्रशासनाला होताच हॉटेलमालक, वधुवरांसह तीनशे जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील मांजरसुंबा परिसरातील कन्हैय्या लॉन्स […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्हा; आजची आकडेवारी आली समोर

बीड दि.7 : जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी (दि.7) कालच्या तुलनेत थोडे दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यात 580 पॉझिटिव्ह आढळून आले.     जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 3 हजार 529 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 2 हजार 949 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 580 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. यात बीड तालुक्यात सर्वाधिक 146, अंबाजोगाई तालुक्यात 114, […]

Continue Reading
CORONA DEATH

एकाच चितेवर आठ जणांना अग्निडाग!

कोरोना बाधितांबरोबर मृतांचा आकडाही वाढू लागला अंबाजोगाई दि.6 : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा हा सातशेच्या पुढे पोहचला आहे. तसेच मृतांची संख्याही वाढतांना दिसत आहे. मंगळवारी (दि.6) स्वाराती रुग्णालयात सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड मृतांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अग्निडाग देण्यात […]

Continue Reading
Corona

बीड जिल्हा; 716 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा मंगळवारी (दि.6) स्फोट झाल्यासारखी परिस्थिती आहे. लॉकडाऊन काळातील सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. आष्टी तालुक्यातील एकाच गावात 20 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात 716 पॉझिटिव्ह आढळून आले.जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, 2 हजार 237 अहवाला प्राप्त झाले असून त्यापैकी 1 हजार 521 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर तब्बल 716 कोरोना […]

Continue Reading
gents parlour

वर्षभरात सहा महिने बंद; सलून व्यवसायिकांनी जगायचं कसं?

बीड : कोरोनाच्या काळात सर्वाधिक फटका बसलेल्या वर्गात सलून व्यवसायिकांचा समावेश होतो. मागील वर्षभराच्या काळात तब्बल 6 महिने सलून व्यवसायिकांनी कडकडीत बंद पाळला. जेव्हा अनलॉक करण्यात आले त्यानंतरही कोणी सलूनमध्ये जाण्यास धजावत नव्हता. आता कुठे त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत त्यांची वाताहत होऊ लागली आहे. सलून व्यवसायिकांचे हातावर पोट असल्याने त्यांनी […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदारांच्या गाडीला दिली धडक

बीड दि. 6 : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या गाडीला धडक दिली. ही घटना मंगळवारी (दि.6) सकाळी घडली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य एक फरार आहे. बीड तालुक्यातील ढेकनमोहा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदार शिरीष वमने यांनी अडविला. मात्र ट्रॅक्टर चालकाने थेट तहसीलदार यांच्या गाडीला ट्रॅक्टरची धडक दिली. या […]

Continue Reading
beed lock down

चालाखी आज झाली उघड… सगळंच बंद; फक्त लॉकडाऊन ऐवजी निर्बंध!

-सामान्य जनतेला जिल्हाधिकार्‍यांचा आदेश समजलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा… जिल्हाधिकारी चिडीचूप : बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या नव्या आदेशाने नागरिक संभ्रमात बालाजी मारगुडे, शुभम खाडे / बीड बीड जिल्हाधिकार्‍यांनी पुकारलेला लॉकडाऊन 4 एप्रिल रोजी संपला आणि 5 एप्रिल रोजी सर्व व्यापार्‍यांनी आपआपली अस्थापने सुरु ठेवली. आज पुन्हा जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र शासनाचा कालचा इंग्रजीमधील आदेश मराठीत […]

Continue Reading
ACB TRAP

एक हजाराची लाच घेतांना शाखा अभियंता पकडला

 गेवराई दि.5 : ग्रामपंचायत येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना शाखा अभियंता यास एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.5) दुपारी गेवराई येथे करण्यात आली. शेख समद नूर मोहम्मद (वय- 57 वर्ष पद शाखा अभियंता (स्थापत्य) ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गेवराई) असे आरोपीचे नाव […]

Continue Reading
anil deshmukh

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी रूपये वसुलीचा आरोप केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृह मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.   ते म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद […]

Continue Reading