pankaja munde

वैद्यनाथ साखर कारखान्यातून 38 लाखांचे साहित्य लंपास

 परळी दि.23 : सुरक्षा रक्षक असतानाही भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोदामातून चोरांनी 37 लाख 84 हजार 914 रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. ही घटना तब्बल दोन महिन्यानंतर कारखाना प्रशासनास कळली आहे. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी लिपिकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. मात्र […]

Continue Reading
railway indian

श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन रूळावरून घसरले,रेल्वे वाहतूक ठप्प

अहमदनगर : सोलापूर रेल्वे विभागातील श्रीगोंदा – बेलवंडी स्थानका दरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले; मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. आज भल्या पहाटे श्रीगोंदा स्टेशनपासून अगदी नजीक तीन किलोमीटर अंतरावर दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचे १२डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला मालवाहतूक करणारी रेल्वे […]

Continue Reading

मराठा आरक्षणासाठी युवकाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन

 पैठण  दि.22 : तालुक्यातील पाचोड येथील एका युवकाने मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालय दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी, आरक्षण संदर्भात लवकरच निर्णय घ्यावा या मागणीसाठी सिनेस्टाईल आंदोलन सुरु केले आहे. युवकाने पाचोड परिसरातील बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले असून आंदोलनाची पूर्वकल्पना असताना देखील पाचोड पोलीस ठाण्याची गोपनीय शाखा मात्र झोपेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील पाचोड येथील […]

Continue Reading
accident

महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला पिकपची धडक; दोघे गंभीर जखमी

बीड : रात्री ड्युटी करून सकाळी घरी जात असलेल्या महामार्ग पोलिसांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोराची धडक दिली. हा अपघात मंगळवारी (दि.22) सकाळी बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात घडली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्ग पोलीस कर्मचारी तांदळे व राख हे पडलसिंगी टोलनाक्यावरून रात्री ड्युटी करून सकाळी दुचाकीवरून (एमएच 23, […]

Continue Reading

पम्चर ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

बीड दि.21 : उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर उभे होते. सोमवारी (दि.21) रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणी परिसरात ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे रस्त्यावरच उभे होते. रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या […]

Continue Reading
bibtya halla

नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश

बीड- पैठण, आष्टी, करमाळा तालुक्यात तब्बल आठ जणांच्या नरडीचाघोट घेणार्‍या बिबट्याला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून बिबट्याच्या दहशतीत वावरणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. वन विभागाच्या शार्प शुटरने करमाळा तालुक्यातील वांगी गावात ह्या बिबट्याला टिपले आहे. बिबट्याने पैठणमध्ये बाप-लेकाच्या नरडीचा घोट घेतला होता. तर आष्टीत एक बालक, एक पंचायत समिी […]

Continue Reading

शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बीड. दि.18 : शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. […]

Continue Reading

बीडमध्ये गोदामात स्फोट; एकाचा मृत्यू

बीड. दि.17: शहरातील जिजामाता चौक परिसरातील महालक्ष्मी रुग्णालयाच्या शेजारील चंपावती हार्डवेर यांचे गोदामात केमिकल मोठा स्फोट झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि. रवी सानप यांच्यासह आदींनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Continue Reading
ACB TRAP

सहनिबंधकासह महिला लिपीक एसीबीची जाळ्यात

  बीड दि.16 : आसिस्टंट रजिस्टार व महिला लिपीकेस सहा हजार रूपयांची लाच घेतांना गुरुवारी (दि.7) रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. आष्टी येथील असिस्टंट रजिस्टार सुधाकर वाघमारे व लिपिक कविता खेडकर असे लाचखोर आरोपींची नावे आहेत. त्यांनी तक्रारदाराकडे संस्थेची नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात लाचलूचपत […]

Continue Reading