नेकनुरहून कांदा घेऊन गेलेल्या टेम्पोला अपघात; तिघांचा मृत्यू

टायर फुटल्याने तुळजापूर जवळ घडली घटना  नेकनुर दि.16 : सोलापूरकडे कांदा घेऊन निघालेल्या टेम्पोचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून टेम्पो रस्ता दुभाजकाला धडकला. या अपघातात नेकनूर परिसरातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात उस्मानाबाद सोलापूर महामार्गावर तुळजापूरजवळ आराधवाडी शिवारात बुधवारी (दि.16) पहाटे दिड वाजताच्या सुमारास झाला. नेकनूरपासून काही अंतरावर असलेल्या निवडूंगवाडी गवळवाडी येथील तीन शेतकरी आपला […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बीड तालुक्यात गांजाची शेती; 63 झाडे जप्त

बीड, दि.16 :बीड तालुक्यातील म्हाळस जवळा परिसरातील तांड्यावर बुधवारी (दि.16) दुपारच्या सुमारास गांजाची झाडे जप्त करण्यात आली. राजाराम दशरथ लांडे (वय 55 रा.बीड ह.मु.म्हाळस जवळा तांडा परिसर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने याच परिसरातील एका शेतामध्ये गांजाची शेती केली होती. यावेळी गांजाची छोटी छोटी 63 झाडे जप्त करण्यात आली असून त्याचे वजन अंदाजे दोन किलो […]

Continue Reading
grampanchayat

सरपंच पदाच्या झालेल्या आधीच्या सोडत रद्द! ग्रामविकास विभागाचा सुधारित आदेश जारी

बीड- ज्या जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज ग्रामविकास विभागाने जारी केला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा नवा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने बाजावला आहे. या आदेशामुळे मोठा […]

Continue Reading

रेखा जरे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेचा जामीन फेटाळला

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दै.सकाळचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक पत्रकार बाळ ज.बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळला.       या गुन्ह्यात नाव आल्यापासून फरार असलेल्या बोठे याने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी हा अर्ज दाखल केला होता. त्याला विरोध करताना पोलिसांनी सुनावणीच्यावेळी […]

Continue Reading

भरधाव टेम्पो पलटी होऊन एकाचा मृत्यू

गेवराई दि.15 : भरधाव टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास गढी उड्डाणपुलावर घडली. गढी जवळील उड्डाणपुलावर (एमपी-04 जी-6521) हा भरधाव मालाने भरलेला टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलिसांनी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]

Continue Reading

पैठण तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आडुळ येथे आत्महत्या

पैठण दि. १४: पैठण तालुक्यातील आडुळ येथे सोमवारी सकाळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आडुळ येथील अशोक गोविंदराव भावले (वय ५७) या शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापीक शेतीला कंटाळून सोमवारी (दि.14) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतामध्ये चिंचेच्या झाडाला […]

Continue Reading
grampanchayat

ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई- मुदत संपलेल्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या […]

Continue Reading

माजलगावातील हिवरा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

बीड दि.11 : जुन्या वादातून दोन गट आमने-सामने आले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) दुपारी माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे घडली. माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे शुक्रवारी दुपारी दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोक समोरासमोर आल्याने शाब्दीक चकमक होवुन काही वेळातच दोन्ही बाजुकडुन हाणमार सुरू झाली. सुंदर लक्ष्मण अवघडे, सर्जेराव […]

Continue Reading

महादेवाच्या मंदिरात युवकाची गळा चिरून हत्या ?

 चंद्रकांत अंबिलवादे : पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाला आठवडा उलटला नाही तोच गंगेश्वर महादेव मंदिरात एका 25 वर्षीय युवकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. महादेवाच्या पिंडावर रक्ताचा अभिषेक घातल्याचे चित्र निर्माण झाले असून या घटनेने पैठण शहरात एकच खळबळ उडाली आहे.        पैठण शहरातील कहारवाडा येथील नंदू देविदास घुंगासे (वय […]

Continue Reading