ACB TRAP

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन दहा लाखाची लाच घेताना पकडले

परळी  : येथील माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय तथा द वैद्यनाथ अर्बन बँकेचे चेअरमन अशोक जैन यास दहा लाखाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि.19) दुपारी केली. अशोक पन्नालाल जैन (वय- 52, व्यवसाय – व्यापार तथा चेअरमन, द वैद्यनाथ अर्बन बँक) असे लाच स्विकारणार्‍या आरोपीचे नाव आहे. […]

Continue Reading
corona

बीड जिल्हा: 73 पॉझिटिव्ह

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा कमी झाला आहे. सोमवारी (दि.19) 73 जण पॉझिटिव्ह आढळून आले.सोमवारी प्रशासनास 588 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 515 रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले तर 73 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई7, आष्टी 1, बीड 15, धारूर 11, गेवराई 11, केज 3, माजलगाव 5, परळी 2,पाटोदा 3, शिरुर 14,वडवणी 1 असा अहवाल […]

Continue Reading

नाथसागरामध्ये आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पैठण  :  पैठण येथील नाथसागर धरणाच्या पाण्यामध्ये सोमवारी (दि.19) सकाळी अनोळखी 55 ते 60 वर्षीय महिलेचे प्रेत तरंंगताना आढळून आले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नाथसागर धरणावर फिरण्यासाठी जाणार्‍या नागरिकांना पाण्यामध्ये महिलेची प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading
arrested criminal corona positive

गोव्याची दारु अंबाजोगाईत पोहचली!

विदेशी दारुसह गुटखा जप्त; डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाची कारवाई  अंबाजोगाई  दि.17 :  लॉकडाऊन उघडून महिना लोटला नाही तर गोव्याची दारु अंबाजोगाईत विक्रीस दाखलही झाली. शनिवारी (दि.17) रात्री डीवायएसपी सुनिल जायभाये यांच्या पथकाने गोव्याची दारु, गुटखा असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

Continue Reading
daroda, gharfodi

पाचोड पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर

दरोडेखोरांनी शेतकर्‍याला तीन लाखाला लुटले पैठण  : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याची हद्द म्हणजे अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर बनले आहे. या हद्दीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. शेतकर्‍यांना मारहाण करून तीन लाख रुपयाचे ऐवज लुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेती वस्तीवर राहणार्‍या शेतकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.       सोलापूर हायवेवर असलेल्या पाचोड येथील […]

Continue Reading

बीड जिल्हा; 121 पॉझिटिव्ह

बीड : दि.16: मागील काही दिवसामध्ये कोरोना पॉझिटिव्हचा आकडा शतकाच्या खाली आला होता. मात्र हा आकडा पुन्हा शतकपार होताना दिसत आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात 121 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरोग्य प्रशासनाला शुक्रवारी 686 अहवाल प्राप्त झाले होते. त्या पैकी 557 रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर 121 पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये अंबाजोगाई 15, आष्टी 25, बीड-30, धारुर 18, […]

Continue Reading