rekha jare

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे फरार घोषित

नगर, दि.4 : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने अखेर फरार घोेषित केले. न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी त्याबाबतचा आदेश आज दिला. दरम्यान, येत्या 9 एप्रिलपर्यंत बोठे याने स्वतःहून न्यायालयासमोर हजर व्हावे. अन्यथा पुढील कारवाई सुुरु करण्यात येईल, असेही आदेश न्यायालयाने दिले. […]

Continue Reading
nana patole

राममंदिराचा निधी डान्सबारवर उडवला जातोय का?

मुंबई, दि. 4 : राम मंदिरासाठी जमा केलेला निधी कोणी डान्सबार किंवा बियरबारमध्ये उडवत असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे. मी 30 वर्षांपूर्वी राम मंदिराला निधी दिला त्याच काय झालं? हे विचारण्याचा मला अधिकार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. राम मंदिर उभारणीसाठी जनतेकडून निधीचं संकलन करण्यात आलं […]

Continue Reading
varsha gaikwad

दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार -शिक्षणमंत्री

मुंबई, दि. 4 : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्याथ्यार्ंंनाही कोरोनाची बाधा झाली आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये उशीरा झाल्याने मुलांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे ह्या परिक्षाच रद्द कराव्यात अशी मागणी पालकवर्गातून पुढे आलेली होती. मात्र दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]

Continue Reading
corona pecaint suicide

गळफास घेऊन 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

बीड दि.4 : घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन एक 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना शहरातील बजरंगनगर येथे गुरुवारी (दि.4) सकाळी उघडकीस आली.पौर्णिमा सतीश निर्मळ (वय 16 रा. बजरंग नगर ता.जि बीड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने बजरंग नगर येथे राहत असलेल्या घरामध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ […]

Continue Reading
suresh dhas

गब्बर सापडतो पण गबरू कसा सापडत नाही – आ. सुरेश धस

बीड : काय तुमची गेली काय सांगावं? लहान लहान लेकरं सुध्दा म्हणतात तो आवाज पुजा चव्हाणचा आहे. मी लहानपणी शोले चित्रपट बघीतला होता. त्या पिक्चरमधील गब्बर पण ठाकूरला सापडला पण या राज्यातला गबरू कोण आहे? या सरकारला गबरू कसा सापडत नाही. असा कसा गबरू आहे. तो आम्ही केवळ किल्पवरच ऐकतोय. गबरूशेठ प्रकरणाने खूप चुकीचा पायंडा […]

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आजही पॉझिटिव्हचा आकडा 50 च्या पुढे

बीड, दि. 4 : कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा आपले हात-पाय पसरले आहेत. बुधवारी 85 रुग्ण आढळून आल्यानंतर आज गुरुवार रोजी पुन्हा 57 रुग्ण आढळले आहेत. तर 890 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.त्यांनी जाहीर केलेल्या अहवालानुसार अंबाजोगाईत 11, आष्टीत 9, बीड 22, गेवराई 3, केज 2, माजलगाव 3, […]

Continue Reading
police patil

खबरदार पोलीस पाटलांना मारहाण कराल तर… सरकारने घेतला हा मोठा निर्णय…

मुंबई, दि. 4 : पोलीस विभागाचा गावपातळीवरील शेवटचा घटक म्हणजे पोलीस पाटील. आता या पोलीस पाटलांना कुणी हात लावला तर खबरदार… कारण राज्याच्या पोलीस महासंचालकांनी इतर सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच कलम 353 चे संरक्षण पोलीस पाटलांना दिले आहे. त्यामुळे कर्तव्य बजावत असताना पोलिस पाटलांना मारहाण झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा संबंधित आरोपींविरूदध दाखल केला जाणार आहे, […]

Continue Reading
shashikala vk

तामीळी राजकारणात मोठी घडामोड; शशीकला यांचा राजकीय संन्यास

चेन्नई, दि. 4 : तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड झाल्याचे पहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललीता यांच्या मैत्रीण व्ही.के. शशीकला यांनी तुरुंगातून बाहेर येताच राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. सहा एप्रिल रोजी तामिळनाडूत निवडणुका होत आहेत. एमके स्टालिन यांचा पक्ष द्रमुक सत्तेत येऊ नये याची काळजी घ्यावी असे अवाहन देखील शशीकला यांनी केले आहे. […]

Continue Reading
narendra modi

पेट्रोलपंपावरील नरेंद्र मोदींचे फोटो हटवा

निवडणूक आयोगाचे निर्देश नवी दिल्ली, दि. 4 : देशातील सर्वच पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. आता हे सर्व बॅनर पंपावरून हटवा, असे आदेश निवडणूक आयोगाने पाच राज्यांना दिले आहेत. त्यामुळे मोदींच्या फोटोपासून वाहनधारकांची तुर्त सुटका झाली असे म्हणावे लागेल. पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणार्‍या होर्डिंगवर पंतप्रधानांचा फोटो असणं […]

Continue Reading
sucide, atmhatya

कोरोना उपचार केंद्रात डॉक्टरकडून रूग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी

डॉक्टरास बडतर्फ केल्याची उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती औरंगाबाद, दि. 4 : महिला कुठेच सुरक्षीत नाहीत, याचा प्रत्यय औरंगाबादच्या कोरोना उपचार केंद्रात आला. या ठिकाणी एका डॉक्टराने चक्क उपचारासाठी दाखल असलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. एवढंच नाहीतर तिला गच्चीवर ओढत नेऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर आजुबाजुचे रुग्णांनी तिकडे धाव घेतली. त्यानंतर या महिलेची […]

Continue Reading