acb trap

सरपंचपुत्र एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.28 : मनरेगा अंतर्गत मंजूर झालेय जलसिंचन विहिरीचे कुशल कामगारांचे अनुदान रकमेच्या चेक तयार झाला. त्यावर सरपंच असलेल्या आईची स्वाक्षरी व ग्रामसेवकांना देण्यासाठी असे वीस हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी सरपंच पुत्रावर एसीबीने कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.28) दुपारी करण्यात आली. सुधाकर नंदू उगलामुगले (वय -34, व्यवसाय शेती रा.नारेवाडी ता.केज जी.बीड) असे […]

Continue Reading
ACB TRAP

परळी थर्मलमधील उप कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.26 : परळीतील परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी मर्यादित येथील उप कार्यकारी अभियंता याने राख वाहतुकीसाठी गेटपास देण्यासाठी खाजगी इसमाच्या मार्फत 80 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवर परळीत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.26) बीड एसीबीच्या टीमने केली आहे. अनिल रामदास वाघ (वय 36 उप कार्यकारी अभियंता,परळी थर्मल पॉवर स्टेशन म.रा.वि.नि.कंपनी […]

Continue Reading
MURDER

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून!

अंबाजोगाई दि. 25 : तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. अर्जुन पंढरी गडदे (वय २२, रा.चीचखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी चीचखंडी […]

Continue Reading
SOLAPUR NAVARDEO MORCHA

मुलगीच मिळेना… मुंडवळी बांधून भावी नवरदेवांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा

सोलापूर दि.21 : वय उलटून गेले तरी लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने सोलापूर येथील तरूणांनी चक्क कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. मोर्चेकरी चक्क फेटे बांधून मंडवळी बांधून, घोड्यावर स्वार झालेले होते. त्यांच्या हातात मुलगी देता का मुलगी म्हणून पाट्या होत्या. ज्योती क्रांती परिषदेच्या मध्यामातून काढलेल्या या मोर्चात शेकडो तरुण सहभागी झाले होते.आज सकाळी शेकडोंच्या संख्येने घोड्यावर बसलेले, […]

Continue Reading

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून रस्त्यात अंगणवाडी सेविकेची साडी ओढली!

बीड दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला अंगणवाडीकडे जात असताना बुधवारी (21) तिघांनी साडी ओढली, व छेड काढली. पीडित महिलेने थेट पाटोदा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र […]

Continue Reading