CHANDRAKANT PATIL

चंद्रकांत पाटलांवर CHANDRAKANT PATILपुण्यात शाईफेक

प्रतिनिधी । पुणेदि.10 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील CHANDRAKANT PATIL यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी भागात घडली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं […]

Continue Reading
ACB TRAP

आणखी एक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

बीड , दि.8 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहे. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तोच सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस […]

Continue Reading
ACB TRAP

शिवाजीनगर ठाण्यातील दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.5 ः मागील अनेक दिवसापासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती दैनिक कार्यारंभने वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला विनयभंगाचा […]

Continue Reading

घरकुल घरकुल करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याने प्राण सोडला!

जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा नागरिकांतून संताप बीड, दि.4 : घरकुल आणि इतर प्रश्नांच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू होते. मात्र घरकुल… घरकुल… याची मागणी प्रशासनाच्या कानावर ऐकायला गेली नाही. अखेर या उपोषणकर्त्याचा उपोषण दरम्यान रविवारी (दि.4) पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या एका उपोषणार्थीकडे लक्ष द्यायला जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला […]

Continue Reading
suresh dhas

अखेर देवस्थान जमीन प्रकरणात आमदार सुरेश धसांवर गुन्हा दाखल!

केशव कदम | बीड दि.30 : देवस्थान जमीन प्रकरणात उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंगळवारी (दि.29) रात्री आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार रामदास सूर्यभान खाडे (रा.करेवाडी ता. आष्टी जि.बीड) आरोपी […]

Continue Reading

खुनातील आरोपीने भरधाव जीपची स्टेरींग फिरवली; अधिकाऱ्यांसह सातजण जखमी

बीड दि.28 : खून प्रकरणाच्या स्थळ पंचनामा करण्यासाठी जात असताना आरोपीने चालू गाडीचे स्टेरिंग फिरवली. यामुळे वेगात असलेली गाडी खड्यात जाऊन कोसळली. या अपघातात पोलीस अधिकारी, कर्मचारी व पंच असे 6 ते 7 जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.28) दुपारच्या सुमारास मांजरसुंबा पाटोदा रोडवरील सासेवाडी फाटा येथे घडली. जखमीवर बीड येथील लोटस हॉस्पिटलमध्ये […]

Continue Reading