nandurghat atmahatya

सोयाबीनच्या भिजलेल्या ढिगाकडे बघत शेतकर्‍याचा गळफास

अमोल जाधव/ नांदूरघाटपरतीच्या पावसाने काढणीला आलेलं आणि काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने अल्पभुधारक शेतकर्‍याने आज लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केज तालुक्यातील राजेगाव येथे 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली. संतोष अशोक दौंड (वय 40 रा. राजेगाव ता. केज) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि […]

Continue Reading

सिरसाळा मोहा अंबाजोगाई रस्त्यांवरील ओढ्यात पीकअप वाहून गेले.

अशोक गलांडे, सिरसाळा सलग तीन दिवसापासून ढगफुटीसदर्ष पाऊस होत असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. ओढे,नाल्या,नदी दुथडी भरून वाहत आहेत. सिरसाळा मोहा अंबाजोगाई रस्त्यांवरील कांन्नापूर येथील गव्हाडा वड्यावर पाण्याने रुद्र रुप धारण केले असून या ओढ्यात एक चारचाकी पीक उप वाहून गेले असून यात तीन जन अडकले होते त्यापैकी दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले […]

Continue Reading

भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची आत्महत्या

बीड दि. बीड येथील भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 12 च्या सुमारास घडली. बियाणी यांनी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना बीड येथील फिनिक्स रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, […]

Continue Reading
nagpur-goa

समृध्दीच्या धर्तीवर नागपूर-गोवा महामार्ग, बीड जिल्हा जोडला जाणार

बीड, दि.8 : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर-गोव्यादरम्यान 760 कि.मी. लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला बीड जिल्हा जोडल्या जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 12 जिल्हे यातून जोडले जात आहेत. या महामार्गासाठी अंदाजे 75 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित […]

Continue Reading
pankaja munde dasara melava

नाराज असल्याच्या चर्चा बंद करा, मी 2024 च्या तयारीला लागलेय – पंकजाताई मुंडे

सावरगाव घाट, दि.5 : मी नाराज असल्याच्या चर्चा मीडियाने थांबवाव्यात मी आता 2024 च्या तयारीला लागले आहे. मला आता कुठलंही पद नको, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरीही तुम्ही ऐवढ्या मोठ्या संख्येने इथे येता, असेच प्रत्येक दसर्‍याला येत राहा, असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केले. त्या सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्यात बोलत […]

Continue Reading

टिप्पर कारचा अपघात; एक ठार, दोघे जखमी

बीड : अंबाजोगाई येथील झंवर कुटुंब पती, पत्नी व मुलगी हे कारने औरंगाबाद येथून अंबाजोगाई येथे परत येताना टिप्पर व कारची धडक होऊन घडलेल्या अपघातात पत्नी ठार तर मुलगी व पिता जखमी झाल्याची घटना धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी जवळ आज शुक्रवारी (दि.३०) पहाटे घडली आहे. मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले असल्याचे समजते. […]

Continue Reading

लाचखोर तलाठ्यासह खाजगी इसम बीड एसीबीच्या जाळ्यात

बीड दि.26 : टॅक्स पावती न देता 7/12 फेरफार नोंद करण्यासाठी तलाठ्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडअंती सात हजार रुपये खाजगी इसमाच्या हस्ते स्वीकारताना दोघांनाही बीड एसीबीने सोमवारी (दि.26) अंबाजोगाई शहरात रंगेहाथ पकडले. प्रफुल्ल सुहासराव आरबाड (वय 30 रा.प्रशांतनगर, अंबाजोगाई) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. तर नजीरखान उमरद राजखान पठाण (वय 43 रा.फ्लॉवर्स […]

Continue Reading
ACB TRAP

सहायक सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.20 : निकालाची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदाराला 1500 रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना धारूर न्यायालयात सहायक सरकारी वकील यांना बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. सुरेखा लांब (वायबसे) सहायक सरकारी वकील, धारूर असे लाच स्वीकारणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्यांनी तक्रारदारास निकालाची प्रत काढून देण्यासाठी 1500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना मंगळवारी (दि.20) दुपारी […]

Continue Reading

माजलगाव धरणात बुडालेल्या डॉ.फपाळ यांचा मृतदेह सापडला

गणेश मारगुडे । खानापूर (माजलगाव) दि.19 : रविवारी सकाळी माजलगाव धरणावर पोहण्यास गेलेले तेलगाव येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंतराव फपाळ यांचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास हाती लागला आहे. येथील मच्छिमारांनी गळ टाकून त्यांचा शोध घेतला असता त्यात त्यांचा मृतदेह हाती लागला. माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ (वय 45) यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे. […]

Continue Reading