dhananjay munde

धनंजय मुंडे- देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट !

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळमुंबई दि.1 : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगताच येत नाही. कालपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणता म्हणता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. फडणवीस सत्तेबाहेर राहणार हा निर्णय त्यांनीच जाहीर केल्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आताही अशीच मोठी घडामोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पहायला मिळाली. […]

Continue Reading

एकीकडे राजकीय उलथापालथ, दुसरीकडे महाराष्ट्रातील आमदाराचा साखरपुढा

औरंगाबाद, दि.29 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी कुठलाही गाजावाजा न करता एका कौटुंबिक सोहळ्यात साखरपुडा आटोपला. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत. भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केल्याने ते राज्यभरात चर्चेत आले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. पक्षसंघटनेत […]

Continue Reading
atyachar

खळबळजनक! नगसेविकेच्या पती विरोधात अत्याचाराचा गुन्हा

नगसेविकेकडून फिर्यादी महिलेविरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार केज दि.28 ः येथील नगरसेविकेच्या पती विरोधात तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिली. त्यावरून केज पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. तर नगरसेविकेने तक्रारदार महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका महिलेने सुग्रीव कराड याने माझ्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून अनेक […]

Continue Reading
supreme courte

बंडखोरांना 12 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

नवी दिल्ली, दि.27: महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांबाबत कुठलाही निर्णय आता 11 जुलैपर्यंत होणार नाही, असे दिसत आहे. कारण आता सर्वोच्च न्यायालयाने 12 जुलैच्या सायंकाळपर्यंत या बंडखोर आमदारांना उत्तर देण्याबाबत वाढीव वेळ दिला आहे. तर उपाध्यक्षांच्या अविश्वासावरील सुनावनी 11 जुलै रोजी ठेवली आहे. महाराष्ट्रातील राजकीय बंडखोरीमुळे जे घटनात्मक पेच निर्माण झालाय त्याचा कालावधी आणखी वाढल्याने तोपर्यंत बंडखोर […]

Continue Reading

भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यावर नवा विचार तयार होतो – छत्रपती संभाजी महाराज

बीड दि.27 : महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृतवाखाली हा नारायण गड काम करत असल्याचा आनंद आहे. एवढे दिवस मी गडावर आलो नाही. याची खंत वाटते. कोल्हापूर कुठे, पश्चिम महाराष्ट्र कुठे पण भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यानंतर एक विचार तयार होतो. हे मागील 350 वर्षापासून सुरू आहे. वारीला संरक्षण देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले […]

Continue Reading

प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावाने आईसमोर केली मुलाची हत्या!

बीड दि.26 : प्रेमप्रकरणातून बहिणीला पळवून नेल्याचा भावाच्या मनात राग होता. दोघे परत आल्यानंतर महिनाभरानंतर मुलीच्या भावाने चाकूने भोसकून प्रियकराची हत्या केली. ही थरारक घटना तालुक्यातील नाथापूर येथे 25 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर साहेबराव कसबे (वय 22, रा.पिंपळादेवी, ता.बीड) असे मयताचे […]

Continue Reading

बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राची सुरक्षा!

15 आमदारांची घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार मुंबई दि.26 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्यासह बंडखोरी करणार्‍या आमदारांच्या विरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा […]

Continue Reading

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप!

बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली. तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून […]

Continue Reading
sanjay raut

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे – खा. संजय राऊत

बीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना […]

Continue Reading