हनुमान महाराज गिरी यांना जामीन

बीड दि.8 : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळ्यानंतर 26 ऑगस्ट रोजी गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला अटक […]

Continue Reading

करुणा शर्मांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

अंबाजोगाई दि.8 : परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी बुधवारी (दि.8) अंबाजोगाई अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.14) सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 5 सप्टेंबर रोजी परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक […]

Continue Reading

सर्पदंशाने दोन चिमुकल्या दगावल्या; आईची मृत्यूशी झुंज

केज दि.8 : दोन मुलींसह आईला सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि.7) मध्यरात्री केज तालुक्यातील सानेसांगवी नं.2 येथे घडली. या घटनेत दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून आईची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दुर्वा (4) व सुप्रिया दीपक साखरे (3) असे मृत चिमुकल्यांची नावे आहेत. तर […]

Continue Reading

‘त्या’ बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

बीड दि.8 तालुक्यातील कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले पुरात वाहून गेली होती. यातील एका मुलाला वाचण्यात यश आले होते तर दुसरा मुलगा हा बेपत्ता होता. बुधवारी सकाळी बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड शहरातील यशराज राहुल कुडके व ओमकार सचिन विभुते हे दोघे कपिलधार येथे मंगळवारी दुपारी धबधबा […]

Continue Reading

माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading
majalgaon dam

माजलगावात बचाव पथकाची बोट उलटली; कर्मचारी अडकून पडला

प्रतिनिधी । माजलगावदि. 7 : आजोबा आणि नातू माजलगाव धरणाच्या ऐन पायथ्याला दरवाजाजवळ सिंदफना नदीच्या पात्रात अडकल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु पाण्याचा वेग जास्त त्यात अंधार आणि वेड्या बाभळींचा अडथळा होत असल्याने अडकलेल्या व्यक्तीपर्यंत जाण्यात बचाव पथकाला यश आलेच नाही. शेवटी जोराच्या लाटेत बचाव पथकाचीच बोट उलटल्याने पथकातील जवानांनी कसाबसा […]

Continue Reading
majalgaon

बीड जिल्ह्यात 24 तासापासून प्रचंड पाऊस

प्रतिनिधी । बीडदि. 7 : बीड जिल्ह्यात सहा सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस 24 तास उलटले तरी थांबायचे नाव घेत नाही. प्रत्येक तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कुठे मुसळधार बरसतोय तर कुठे त्याची संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले आहे. पिकांमध्ये देखील पाणी साचून आतोनात नुकसान […]

Continue Reading