प्राचार्या भारती बांगर यांचे निधन

गेवराई दि.7 : शहरातील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या भारती बांगर यांचे मंगळवारी (दि.7) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होत्या त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भारती बांगर (वय 70) यांचे बीड जिल्ह्यामध्ये मोठे नाव लौकिक होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाची गेवराई तालुक्यात पहिली शाळा सुरू करून तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये […]

Continue Reading

बीड एसीबीला भारत राऊत यांची नियुक्ती

बीड दि.6 : बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून भारत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. येथील स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक भारत राऊत यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे बदली झाली होती. बीड लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी बीड […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करूणा शर्माची न्यायालयीन कोठडीत रवानगी

बीड दि.6 : करूणा शर्मा याना सोमवारी (दि.6) अंबाजोगाई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. परळी येथे रविवारी (दि.5) करुणा शर्मा या ना.धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य एकावर अनुसाचीत जाती जमाती अत्याचार […]

Continue Reading
aaranwadi, aranwadi talav

बहुचर्चित आरणवाडी साठवण तलाव खचण्यास सुरुवात?

तलाव फुटण्याच्या भीतीने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण सचिन थोरात । धारूरदि. 6 : शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर घाटात असणारा आरणवाडी साठवण तलाव मागील दोन महिन्यापासून सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसाने सांडव्यावरून वेगाने पाणी पडत आहे. परंतु सदरील तलावाच्या पिचिंग असलेल्या भिंतीजवळ पाणी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या विहिरीचा भाग […]

Continue Reading
karuna dhananjay munde

करुणा शर्माला अटक; सोमवारी न्यायालयात करणार हजर

परळी दि.5 : गेल्या काही दिवसांपासून सोशलमिडीयावर चर्चेत असलेल्या करुणा शर्मा यांनी घोषित केल्याप्रमाणे की, मी परळीत येवून पत्रकार परिषद घेणार त्याप्रमाणे रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता बीड मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर परळीत 12 ची वेळ दिलेली असताना दुपारपर्यंत त्या पोहचल्या नव्हत्या. दुपारी दोन नंतर परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर तिथे मंदिर परिसरातील महिलांबरोबर […]

Continue Reading
crime

करुणा शर्मासह एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

बीड दि.5 : करुणा शर्मा परळीत रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास दाखल झाल्या. यावेळी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेल्या एकाने चाकूने पोटावर वार केला. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मासह अन्य एकावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे (रा.शिवाजीनगर परळी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, […]

Continue Reading

पिस्टल आढळल्याने खळबळ; हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी

परळी दि.5 : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणार्‍या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून […]

Continue Reading