chori, gharfodi

तेलगाव येथे मध्यरात्री जबरी चोरी!

महिलांना मारहाण करत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास धारूर: महिलांना बेदम मारहाण करत शास्त्राचा धाक दाखवून अंगावरील दागिन्यासह रोख रक्कम असा तीन लाखाचा ऐवज लंपास केला. ही जबरी चोरीची घटना तेलगाव येथील श्रीकृष्ण पार्क येथील रो हाऊसमध्ये गुरुवारी (दि.29) मध्यरात्री घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धारुर तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना […]

Continue Reading

पोलिसांच्या बदल्याची यादी जाहीर!

बीड : जिल्ह्यातील विहित कालावधी पूर्ण झालेल्या 350 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुख्यालय येथे गुरुवारी (दि.30) मुलखती घेण्यात आल्या होत्या. यातील 308 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. तर उर्वरित 42 जणांची यादी कधी प्रसिद्ध होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Continue Reading
accident

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

आष्टी दि.29 : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आष्टी तालुक्यातील धानोरा येथे हिवरा रोडवर गुरुवारी (29 जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धानोरा-हिवरा रोडवर धोंडे कॉलेज जवळ हा भिषण अपघात झाला. वाळके […]

Continue Reading

काळ्या बाजारामध्ये जाणारा धान्याचा आयशर टेम्पो पकडला!

आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आष्टी दि.29 : रेशन दुकानांवर गोर-गरीब नागरीकांना अल्पदरात पुरवण्यात येणारा गहू, तांदूळसह इतर धान्य असा एकूण 105 क्विंटल धान्य काळ्याबाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वस्त धान्य दुकानदार हे गोरगरीब लाभार्थींना धान्य न देता त्याची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात विक्री केली […]

Continue Reading
corona virus

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित दोनशेपार!

प्रतिनिधी । बीडदि.24 ः जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. गुरुवारी (दि.29) जिल्ह्यात 212 कोरोना बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाला 5241 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 212 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 5029 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 34, अंबाजोगाई 3, आष्टी 71, धारूर 6, गेवराई 10, […]

Continue Reading
police bharati

मुहूर्त ठरला! 350 पोलीस कर्मचार्‍यांच्या होणार बदल्या

बीड दि.28 : मागील काही दिवसापासून बदल्यांची चर्चा जोरात सुरु होती. बदल्या कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. अखेर बदल्यांचा महूर्त ठरला असून आज गुरुवार (दि.29) रोजी जिल्ह्यातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या 350 पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. एकाच ठिकाणी पाच वर्ष सेवा पूर्ण करणारे, तालुक्यात 12 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या प्रशासकिय […]

Continue Reading

दिवसा कार्यालयात न दिसणारे एआरटीओ रात्री फिरु लागले!

त्यात स्कार्पिओने गाडीला दिली धडक ; गेवराई पोलीसात गुन्हा नोंदबीड दि.28 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कधी न दिसणारे एआरटीओ मात्र रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक व अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फिरु लागले आहेत. ही बाब त्यांच्या शासकिय वाहनाला दिलेल्या धडकेमुळे उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरुन स्कार्पिओच्या चालकाविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा नोंद करण्यात […]

Continue Reading
gold

सोन्याच्या बिस्कीटाच्या मोहापायी, महिलेने अंगावरील सोने काढून दिले!

परळी दि.27 : आठवडी बाजारातून घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यामध्ये दोन सोन्याचे बिस्कीट दिसले. त्यातील एक बिस्कीट महिलेने उचलले. पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्कीटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या, असे म्हटल्यानंतर या महिलेने अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले. सदरील हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत महिलेने तक्रार दाखल केली. सुनिता नवनाथ गिते […]

Continue Reading