acb trap

बीडमध्ये 900 रुपयांची लाच घेताना कर्मचारी पकडला!

बीड दि. 10 :येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक 900 रुपयांची लाच व 600 रुपये फिस घेताना रंगेहाथ पकडला. सोमवारी (दि.10) सायंकाळी बीड एसीबीने ही कारवाई केली. विनोद गिरीधर मुनेश्वर (वय 32) असे बीड सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांचे आईचे नावावरील जमीन तक्रारदार यांचे नावावर करण्याबाबत गेवराई कोर्टाचे […]

Continue Reading
acb trap

बीड एसीबीने लाचखोर पकडला!

बीड एसीबीची कारवाई बीड दि. 26 : मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. यामध्ये फीस भरूनही एक हजार रुपयाची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.26) दुपारच्या सुमारास करण्यात आली. मुबारक बशिर शेख (वय […]

Continue Reading
ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]

Continue Reading
ACB TRAP

शिवाजीनगर ठाण्यातील दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.5 ः मागील अनेक दिवसापासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती दैनिक कार्यारंभने वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला विनयभंगाचा […]

Continue Reading

लाचखोरांना शिक्षा झाल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणार नाही – शंकर शिंदे

दक्षता जनजागृती सप्ताहात तक्रारदारांचा केला सत्कार बीड दि.6 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दक्षता जनजागृती सप्ताह 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या दरम्यान जिल्ह्यात राबवण्यात आला. या उपक्रमाचा समारोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड येथील कार्यालयात रविवारी (दि.6) संपन्न झाला. यावेळी बीड उपाधीक्षक शंकर शिंदे, भागवत वराट, साखरे, पोलीस निरीक्षक अमोल धस, रविंद्र परदेशी आदींची उपस्थिती होती.यावेळी […]

Continue Reading

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप!

बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली. तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून […]

Continue Reading

लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

माजलगाव दि.6 : सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद बीड येथे पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडअंती 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव पंचायत समिती समोर सोमवारी (दि.6) दुपारी रंगेहात पकडले. रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30, विस्तार अधिकारी, ( ग्रामपंचायत विभाग), पंचायत […]

Continue Reading
acb office beed

बापरे! थकलेला पगार, सेवानिवृत्तीचा लाभ देण्यासाठी 12 लाखांची मागणी!

दिड लाखांची लाच घेतांना संस्थेचा सचिव, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यातबीड दि.2 : सेवानिवृत्त झाल्यानंतरही संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव, मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे, थकलेला पगार, केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्याकडे 12 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा […]

Continue Reading
ACB TRAP

लाचखोर वाहन निरिक्षकासह एजंट एसीबीच्या जाळ्यात!

बीड एसीबीची कारवाईबीड दि.20 : वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक व एका खाजगी एजंटवर बीड एसीबीने गुरुवारी (दि.20) कारवाई केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरटीओ कार्यालयात झालेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात वसुली होत […]

Continue Reading