atyachar

कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीवर विद्यालयातीलच विद्यार्थ्याकडून अत्याचार!

बीड दि.24 : कायद्याचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थीनीला तिच्या पुढच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर तब्बल सहा वर्षे अत्याचार केले. त्यानंतर एका दुसर्‍या मुलीशी संसार थाटणार असल्याची माहिती पीडितेला मिळाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा (नाव बदललेले) […]

Continue Reading
death

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!

बीड दि.8 ः शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि.8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच एक पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ […]

Continue Reading
areested

म्हाडा पेपर फुटी प्रकरणामध्ये बीडच्या महिला एजंटला अटक!

परीक्षार्थींना गोळा करण्याचे करायचे कामबीड दि.23 : म्हाडापरीक्षेचा पेपर फुटीप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिला एजंटला बीड येथून अटक केली आहे. परीक्षार्थींना गोळा करण्याचे काम ही महिला एजंट करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत म्हाडा पेपरफुटी प्रकरणातील ही अकरावी अटक आहे. कांचन श्रीमंत साळवे (वय 31, रा. नागसेन नगर, धानोरा रोड, बीड) असे या […]

Continue Reading

बीडमध्ये बससस्थानक परिसरात दिवसाढवळ्या युवकाची हत्या!

बीड दि.14 : धारदार शस्त्राने सपासप वार करत एका युवकाची हत्या करण्यात आली. ही थरारक बीड शहरातील बसस्थानक परिसरातील एचडीएफसी बँकेसमोर दिवसाढवळ्या घडली. या घटनेने शहरत खळबळ उडाली असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. शेख शाहिद शेख सत्तार (वय 24 रा.खासबाग, बीड) असे […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

पालीच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू!

बीड दि.18 : शहरातील दोन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16 दोघे राहणार शिंदेनगर ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास […]

Continue Reading

चारित्र्याच्या संशयावरुन गळा आवळून पत्नीचा खून!

बीड दि.11 : चारित्र्याव संशय घेत गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना शहरातील मासूम कॉलनी येथे शनिवारी (दि.11) रात्री 8 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पेठबीड पोलीस ठाण्याचे पोनि.विश्वास पाटील व इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शेख मलिका शेख याकूब (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना […]

Continue Reading
atamahatya

कंकालेश्वरच्या कुंडात उडी घेवून मुलीची आत्महत्या

बीड दि.10 : शहरातील कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात उडी घेवून एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. सायली अशोक उगले (वय 16) असे मयत मुलीचे नाव आहे. शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सदर मुलीने […]

Continue Reading

मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी!

बीड दि.27 : अनोळखी नंबरवरुन कॉल करुन मुलीचे अश्लील फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला आणि फेसबुकला पोस्ट करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पित्याच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 49 वर्षीय इसमाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी 8623989832 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून फिर्यादीच्या मुलीला 8 जुलै ते 23 जुलै […]

Continue Reading