रोडवर जॅक टाकून दरोडा घालणारा आरोपी जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईबीड दि.18 : रोडवर जॅक टाकून दरोडा घालणार्‍या टोळीतील एक वर्षापासून पाहिजे असलेला आरोपी मंगळवारी (दि.18) जेरबंद करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या (beed lcb team) टिमने केली. त्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम आप्पा शिंदे (रा.नांदूरघाट ता.केज) (vikram appa shinde) असे आरोपीचे नाव आहे. 23 मे 2022 […]

Continue Reading

पंकजाताई मुंडेंचे स्वतःसह राजेंद्र मस्केंना विजयी करण्याचे आवाहन!

बीड दि.30 ः बीडचा आमदार हा भाजपाचा (beed mla bjp) असला पाहिजे, त्याच बरोबर जिल्ह्यातील इतरही भाजपा उमेदवार विजयी करायचे आहेत. त्यासाठी सर्वांनी पंकजाताईंच्या पाठीमागे उभे रहावे, त्या जिल्ह्याचे चित्र बदल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावणकुळे यांनी केले. त्यानंतर बोलताना पंकजा मुंडे (pankaja munde) म्हणाल्या की, पक्ष काय भूमिका घेणार मला माहित […]

Continue Reading

अन् डोळ्यासमोर वडीलांचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू!

बीड 24 : शेतात विहिर खोदण्याचे काम सुरु होते. त्यात खडक फोडण्यासाठी ब्लास्टींगला आणलेल्या जिलेटिनच्या कांड्या विहिरीच्या बाजूलाच बांधवर झाकून ठेवलेल्या होत्या. परंतू याची माहिती शेतकर्‍याला नव्हती. आज सकाळी शेतकर्‍याने बांध पेटवला, त्याची आग जिलेटिनच्या कांड्यापर्यंत पोहचली. यावेळी बाजूलाच असलेल्या मुलाला जीलेटीनची माहिती होती. त्यामुळे तो वडीलांना तिथून बाजूला व्हा, हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे धावला, परंतू […]

Continue Reading

जिल्ह्यातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची टक्केवारी विरोधात जनआंदोलन उभारणार!

बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरेंचा इशारा बीड दि. 10 : मागील तीन वर्षात जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग यासह सर्व विभागातील अधिकारी बरबटले आहेत. याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. त्यांच्याकडून टक्केवारी घेण्यास सुरू झाली आहे. यामुळे जिल्हयाचा विकास झाला नाही पण लोकप्रतिनिधींची भरभराट झाली. ही टक्केवारी अशीच सुरू राहिल्यास जिल्ह्याची […]

Continue Reading

राज्यस्तरीय खटोड कीर्तन महोत्सवात आईला स्टेजवर जागा पण घरात नाही

गौतम खटोड यांची आई, भाऊ, पुतण्याला हिन वागणूक; पत्रकार परिषदेत आईने मांडल्या व्यथा बीडदि.9 ः दोन दशकापासून बीडमध्ये राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव घेणारे स्व.झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठाण आहे. या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून समाजाला नियतीचे डोस पाजणारे गौतम खटोड मात्र घरात कुटूंबीयांना हिन वागणूक देत आहेत. रात्रीच्या बारा वाजता आईला घराच्या बाहेर काढत आहेत. भावाला, पुतण्याला नाहक त्रास देत […]

Continue Reading
crop-insurance

शेतकर्‍यांच्या ट्रेंड नंतर आणखी 31 महसूल मंडळात अग्रीम देण्याचा निर्णय

बीड दि.14 : दि.14 : किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियावर चालवलेल्या ट्रेंडनंतर जिल्हाभरातील सर्वपक्षीय नेत्यांचे डोळे खाडकन् उघडले आहेत. या ट्रेंडनंतर आधी 10 आणि नंतर 21 महसूल मंडळात जिल्हाधिकार्‍यांनी विमा देण्याची अधिसुचना काढलेली आहे. मात्र मग्रूर कंपनी हा विमा देईल का प्रश्नच आहे. यापुर्वी जिल्हाधिकार्‍यांनी 16 महसूल मंडळांना विमा देण्याचा निर्णय घेतला होता. […]

Continue Reading