बेपत्ता शिक्षकाचा पालीच्या धरणात मृतदेह आढळला

बीड दि.12  गेवराई येथील बेपत्ता जिल्हा परिषद शिक्षकाचा मृतदेह पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये गुरुवारी (दि.12) दुपारी आढळून आला. सदरील मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला आहे. बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी धाव घेत नपच्या बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यानंतर सदरील […]

Continue Reading
arrested criminal corona positive

नाशिकात खडसेंच्या कार्यक्रमात सोन्याची चैन चोरणारा गजाआड

बीड एलसीबीची कारवाई बीड दि.7 : नाशिक येथे एकनाथ खडसे यांच्या दौर्‍यामध्ये एका कार्यकर्त्याच्या गळ्यातील 127 तोळ्याची चैन लंपास करण्यात आली होती. सदरील आरोपी हा बीडचा असल्याची माहिती बीड एलसीबीला मिळाली. आरोपीला ताब्यात घेऊन त्याकडून चैन हस्तगत केली व आरोपीला चांदवड पोलिसांच्या स्वाधीन केले.         24 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता […]

Continue Reading
arrested criminal corona positive

बर्दापूर येथील पुतळा विटंबना; आरोपी वडवणीतून केला अटक

दारुच्या नशेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली प्रतिनिधी । अंबाजोगाई दि. 31 ः बर्दापूर येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.30) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस पाच दिवसाची (दि.4 […]

Continue Reading

गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून बीडच्या तरुणाला पुण्यात लुटले

शस्त्राचा धाक दाखवून दहा हजार घेतले बीड,  दि.14 :  बीड येथील एका तरुणाची गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून पुण्यातील व्यक्तीसोबत ओळख झाली. त्यानंतर पुण्यात भेटायला गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करुन दहा हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        कोंढवा ठाण्याचे […]

Continue Reading
BEED CIVIL HOSPITAL

रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांकडून जिल्हा रुग्णालयामध्ये तोडफोड

जिल्हधिकार्‍यांची रुग्णालयात भेट  बीड दि.7 :  जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कॉट फेकून देत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. तसेच काही मशिनचीही तोडफोड केली. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत तेथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सुचना दिल्या.       किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या […]

Continue Reading
arrested criminal corona positive

चौसाळ्यातील कृषि दुकान फोडणारा चोरटा गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई बीड , दि.29 : तालुक्यातील चौसाळा येथील एक कृषि दुकान अज्ञात चोरट्याने फोडले होते. या प्रकरणी नेकनूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करत आरोपीला उस्मानाबाद येथून अटक केली आहे.     आशोक दिलीप कळसकर (वय 30 रा.चौसाळा) असे आरोपीचे नाव आहे. त्याने रविवारी (दि.20) […]

Continue Reading
police bharati

राज्यात होणार मेगा पोलीस भरती

बीड : कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील भरतील प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता आहे. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत […]

Continue Reading