budun mrutyu-panyat budun mrutyu

शेततळ्यात बुडून बापलेकासह एकाचा मृत्यू

गेवराई दि.10 : शेततळ्यात बुडून बाप-लेकासह अन्य एका जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी (दि.10) सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुनिल जग्गनाथ पंडित (वय 40), त्यांचा मुलगा राज पंडित (वय 12) व आदित्य पाटील (वय 10 रा.शेवगाव) असे शेततळ्यात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गेवराई येथे सुनील पंडित […]

Continue Reading

गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचे दुःखद निधन

बागपिंपळगाव परिसरातील पुलाखालील आढळला होता मृतदेह  गेवराई दि.3 :  गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील पुलाखाली 55 वर्षीय अज्ञात इसमाचा 2 मे रोजी मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलीसांकडून अवाहन करण्यात आले. काही तासातच या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह एम.ए.मराठी विषयाचे गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचा असल्याचे निष्पन्न झाले. नाट्यकलावंत, गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक असलेले […]

Continue Reading
MURDER

जागेच्या वादातून आईने केली मुलाची हत्या!

गेवराई दि.8 : जागेच्या वादातून सावत्र आईने कुर्‍हाडीने वार करुन मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लुखामसला येथे गुरुवारी (दि.8) रात्री घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान डोमाळे (रा.लुखामसला ता.गेवराई) यांना दोन पत्नी आहेत. व सात अपत्य आहेत. यापैकी […]

Continue Reading
ACB TRAP

एक हजाराची लाच घेतांना शाखा अभियंता पकडला

 गेवराई दि.5 : ग्रामपंचायत येथे नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी अंदाजपत्रकाची तांत्रिक मान्यता देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्विकारताना शाखा अभियंता यास एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.5) दुपारी गेवराई येथे करण्यात आली. शेख समद नूर मोहम्मद (वय- 57 वर्ष पद शाखा अभियंता (स्थापत्य) ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग जिल्हा परिषद गेवराई) असे आरोपीचे नाव […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले

बीड दि.17 : अवैध वाळू वाहतूक करणार्‍या हायवा टिप्परवर बुधवारी पहाटे कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन टिप्पर चालकासह दोन मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली. अवैध वाळू उपसा व वाहतूक कितीही कारवाया केल्यातरी कमी होताना दिसत नाही. बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सपोनि.विलास […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मच्याऱ्याचा मृत्यू

बीड दि. 9 : रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास […]

Continue Reading

बनावट दारू विक्री करणारी टोळी पकडली

  पैठण दि. 5 : बनावट दारू तस्करी करून पैठण परिसरात विक्री करणाऱ्या टोळीचा दारुबंदी विभागाने पर्दाफाश केला आहे. १८० मिलीच्या १ हजार १५२ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सदरील आरोपींना पाचेगाव येथून अटक केली आहे. पैठण तालुक्यातील विविध ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून बनावट दारूची विक्री केली जात आहे. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क […]

Continue Reading
accident

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गेवराई  दि.25 : गेवराई शहराजवळील विठ्ठलनगर येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.25) सायंकाळच्या सुमारास घडली. बाबासाहेब तुळशीराम सौंदलकर (वय 55 रा.रेवकी ता.गेवराई), गोरख लिबांजी शेंडगे (वय 45 रा.रेवकी ता.गेवराई) अशी अपघातातील मयताची नाव आहे. ही दोघे दुचाकीवरुन गेवराईवरुन विठ्ठलनगर येथे […]

Continue Reading

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने शेतकऱ्यास चिरडले; नातेवाईकांचा आक्रोश

गेवराई : सकाळी शेतामध्ये जात असलेल्या शेतकऱ्यास अज्ञात वाळूच्या हायवा टिप्परने चिरडले. नातेवाईकांनी मृतद्देह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. ही घटना सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान घडली. गंगावाडी येथील शेतकरी रुस्तुम मते (वय 60) हे सकाळी 6.30 च्या दरम्यान आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी जात असताना राक्षस भुवन येथून अवैधरित्या […]

Continue Reading

शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बीड. दि.18 : शासकीय योजनेतील पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.बीड जिल्ह्यातील राक्षस भुवन येथील धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ‘मायबाप सरकार मी आत्महत्या करीत आहे शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो तर प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत. […]

Continue Reading