prakash solanke

भाजपातच काय शिंदे गटातही जाऊ – आ.प्रकाश सोळंके prakash solanke

माजलगाव, दि.13 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंत्रिपदावर संधी न दिल्याने नाराज असलेले माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके prakash solanke हे भाजपात जाणार असल्याची जोरदार चर्चा मागील काही महिन्यांपासून माजलगावात सुरू आहे. आज या चर्चेवर खुद्द आ. सोळंके यांनीच प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, मतदार म्हणत असतील की मी भाजपात जाणार आहे तर नक्कीच विचार करावा लागेल. भाजपातच […]

Continue Reading

माजी आ.आर.टी. देशमुख यांच्या अंगरक्षकांची भाजप बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी

सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल माजलगाव – भाजप बूथप्रमुखांच्या एका ग्रुपमध्ये माजी आमदार देशमुख यांना एका कार्यक्रमात डावल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची बातमी प्रकाशित झाली होती.या बातमी खाली कमेंटमध्ये एका बुथ प्रमुखाने कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.अशी कमेंट का टाकलीस म्हणत माजी आमदार देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्या बूथ प्रमुखास हातपाय तोडण्याची धमकी दिली असल्याचा […]

Continue Reading

माजलगावाच्या ‘त्या’ सर्वानाच वाचवण्यात यश

माजलगाव- माजलगाव येथील सिंदफना नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजोबा आणि नातवाला वाचविण्यात यश आले आहे. पहाटे 3 वाजता पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्यात आली. देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते. धारूर तालुक्यातील आरणवाडी तलावाचा सांडवा फोडल्यानंतर माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात […]

Continue Reading

माजलगावात खाद्य तेलाच्या गोडाऊनला भीषण आग

फुले पिंपळगाव : माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे असलेल्या नवीन मोंढ्यातील संतोष मुळचंद अब्बड यांच्या महावीर ट्रेडिंग व रॉयल केअर या खाद्यतेल असलेल्या गोडाऊनला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे खाद्यतेलाचे नुकसान झाले आहे.आग लागल्याचे वॉचमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अब्बड यांना घटनेची माहिती दिली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटना […]

Continue Reading

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून!

माजलगाव दि.8 : तालुक्यातील पात्रुड येथे अनेक दिवसापासून जागेच्या किरायावरून दोन भावांमध्ये वाद होत होता. त्या वादाचे रूपांतर सोमवार (दि.8) रोजी मोठ्या भांडणात झाले. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. आरोपी स्व:त पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे प्लॉटच्या किरायाचा वादावरून दोन भावामध्ये अनेक दिवसापासून वाद सुरु होता. सोमवारी […]

Continue Reading
CHAKU-HALLA

दुचाकीचा कट मारल्यावरुन युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

माजलगाव शहरातील महात्मा फुले शाळेजवळील घटना माजलगाव : दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरून युवकात झालेल्या बाचाबाचीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ही घटना शहरातील महात्मा फुले शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धांत ज्ञानोबा धायजे व त्याचा मित्र विश्वानंद राजेश साळवे हे आपल्या दुचाकीवरून अशोक नगरकडे जात होते. यावेळी […]

Continue Reading