CORONA

बीड जिल्हा : तब्बल ३७ पॉझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी घेतलेल्या स्वॅबचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यात 37 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 505 वर जाऊन पोहोचली आहे.आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये या तालुक्यांचा समावेश आहे.जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती पुढील प्रमाणे

Continue Reading
corona

बीड जिल्ह्यात आढळलेले रुग्ण कुठले?

बीड शहरातील प्रसार वाढत चालला… बीड, दि. 22 : जिल्हावासिय आज झोपेत असताना पुन्हा एकदा भला मोठा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल 44 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या 425 झाली आहे. आढळलेले रुग्ण नेमके कुठले?बीड तालुका 2329 वर्षीय पुरुष (रा मावतामाळी चौक,बीड शहर),50 वर्षीय पुरुष […]

Continue Reading
collector office beed

खाजगी दवाखान्यांना बीड जिल्हा प्रशासनाची तंबी

बीड, दि. 16 : बीड शहरातील एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनाने आज एक पत्रक जारी करून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांना कारवाई करण्याची तंबी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाचे रुग्ण वाढत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता काही रुग्ण खासगी दवाखान्यात […]

Continue Reading
beed lock down

बीड शहराचा लॉकडाऊन आज उठणार की वाढणार?

बीड, दि. 9 : बीड beed शहरात 2 जुलैपासून लॉकडाऊन lockdown करण्यात आला आहे. त्या लॉकडाऊनची मुदत आज रात्री 12 वाजता संपत आहे. परंतु हा लॉकडाऊन वाढणार की उठणार? याबाबत नागरिक ऐकमेकांना विचारपूस करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून याबाबत काहीच सांगितले जात नसून नागरिक संभ्रमात आहेत. ‘कार्यारंभ’ने याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा […]

Continue Reading
swab

बीड जिल्ह्यातील 63 स्वॅब तपासणीस

बीड : जिल्ह्यातील आज एकूण 63 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यात अंबाजोगाई येथील स्वारातीमधून किती स्वॅब घेण्यात आले याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय बीड-21, सी.सी.सी., बीड -41, उपजिल्हा रुग्णालय, परळी-1 असे 63 स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. सायंकाळपर्यंत अहवाल येतील असे सांगण्यात आले आहे.

Continue Reading

बीड जिल्ह्यातील ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळून संपर्कात आलेले बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, अंबाजोगाई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता देशमुख, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांचे रात्री स्वॅब घेतले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रेखावर यांनीच स्वतः दिली.8 जून रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन केले होते. हे […]

Continue Reading