Site icon कार्यारंभ लाईव्ह

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विनायक मेटेंच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार

vinayak mete

vinayak mete

जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू

बीड : मुंबईनजीक झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विनायकराव मेटे यांचे निधन झाले. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपापाठीमागे कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये उद्या (दि.15) दुपारी 3.30 वाजता अंत्यविधी होणार आहेत. मेटे यांच्या अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांनी दिली आहे.

बीड शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपापाठीमागे कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यविधीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी आमदार संदीप क्षीरसागर, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, विनोद कवडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. तसेच, शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.

Exit mobile version