बस- कारच्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू, मयत प्रवाशी माजलगावचे

माजलगाव दि.18 : खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पाथरूडजवळ रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बस आणि हुंडाई चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मयत हे माजलगाव येथील असून या घटनेमुळे माजलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील पात्रूड […]

Continue Reading
acb trap

बाँडच्या चढ्या दराने विक्रीवर बीड एसीबीचा पहिल्यांदा दणका!

केशव कदम – बीडदि.१७ : कुठल्याही कामासाठी अधिकचा मोबदला घेण्याची अनेकांना सवय लागली आहे. जिल्ह्यात मुद्रांक बाँडची चढ्या दराने विक्री होत असल्याच्या चर्चांदरम्यान बीड एसीबीने गेवराईत कारवाई केली आहे. मागील तारखेचा 500 रुपयांचा बाँड तक्रारदाराला तब्बल ३ हजार ५०० रुपयांना विकल्याप्रकरणी एका 70 वर्षीय बाँड विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिवारी (दि.17) गेवराई तहसील कार्यालयाच्या आवारात […]

Continue Reading
acb trap

बीड : 20 हजारांची लाच घेताना लाचखोर पकडले!

केशव कदम – बीड दि.14 : लाचखोरीच्या घटनांचे प्रमाण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. कुठलेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही. तक्रारदाराचा चौकशी अहवाल व्यवस्थित तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१४) दुपारी तीनच्या सुमारास रंगेहाथ […]

Continue Reading

भूसंपादन मावेजा घोटाळा ; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकला जामीन!

केशव कदम – बीड दि.14 : जिल्ह्यातील बहुचर्चित भूसंपादन मावेजा गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.१४ ऑक्टोबर) जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर मागील काही महिन्यांपासून पाठक कारागृहात होते. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी देण्यात येणाऱ्या १५४ प्रकरणांमध्ये मागील तारखांचे आदेश तयार करून […]

Continue Reading

लॉकअपमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!

पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण बीड दि. 10 : तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संबंधित आरोपीचे प्राण वाचले. त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बालाजी शिंदे […]

Continue Reading
बीड नगर पालिकेने एलईडीचे पथदिवे घेतले की सोन्याचे?

बीड नगर पालिकेने एलईडीचे पथदिवे घेतले की सोन्याचे?

सिद्धीख इनामदार । बीड : बीड नगरपरिषदेच्या पथदिवे खरेदीचा विषय सध्या शहरात चांगलाच चर्चेत आला आहे. शहरातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे लावणे अत्यंत आवश्यक असले, तरी त्यासाठी होणार्‍या सार्वजनिक खर्चाची पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची आहे. नगरपरिषदेने खरेदीसाठी निश्चित केलेले दर आणि बाजारात सहजासहजी उपलब्ध असलेल्या एलईडी पथदिव्यांचे दर यांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. 195 ते 200 वॅटचा […]

Continue Reading

बीडमध्ये खळबळः सेवानिवृत्त क्लासवन अधिकार्‍यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात

केशव कदम – बीडदि.8 ः जिल्ह्यात सकाळी तलाठ्याला लाच स्वीकारताना पकडल्यानंतर काही तासांतच बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरी मोठी कारवाई केली. गायींच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुका पशुधन पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात सेवानिवृत्त क्लासवन अधिकार्‍यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पाटोदा तालुक्यात करण्यात आली. डॉ. […]

Continue Reading

आठ हजारांची लाच घेताना लाचखोर पकडला!

बीड : केशव कदम दि.8 : जिल्ह्यात एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या जमिनीची फेरफार नोंद घेण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना उमरी येथील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी परमेश्वर फलके यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ८) दुपारी केज तहसील कार्यालय परिसरात रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी तलाठी परमेश्वर […]

Continue Reading

मीटर बदलण्यासाठी स्वीकारली 13 हजाराची लाच!

–जालना एसीबीची परळीत कारवाई प्रतिनिधी । बीड दि.27: वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून नवीन मीटर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर 13 हजार रुपये स्वीकारताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी 1.10 वाजता परळी शहरातील जिरगे नगर डीपीजवळ करण्यात आली. अरुण सुरेश गिते […]

Continue Reading
suicide

बेपत्ता ग्रामसेवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

गेवराई दि.11 : गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी व बागपिंपळगाव ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळणारे ग्रामसेवक तुकाराम भागवत घोलप हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, बीड शहरालगतच्या सह्याद्री देवराई परिसरात शुक्रवारी (दि. ११) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामसेवक तुकाराम घोलप हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह […]

Continue Reading