शेतकरी ऊसतोड आणि कामगारांचे पैसे देणे ही आमची ‘औकात ’ – बजरंग सोनवणे

बीड


परळी, दि.3 : ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे पैसे वेळेवर देणे. ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या घामाचे पैसे देणे ही आमची औकात आहे. ज्यांना वडिलांनी उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत. त्याने कामगार व शेतकर्‍यांचे पैसे बुडविले त्यांची लायकी काय? त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टाच असे असा हल्लाबोल बजरंग सोनवणे यांनी केला. ते परळी तालुक्यातील पौळ पिंपरी, गोवर्धन (हिवरा), हिवरा (गोवर्धन), रामनगर तांडा, जळगव्हाण, रामेवाडी (कासारवाडी), पोहनेर, दिग्रस, बोरखेड, तेलसमुख या गावांना भेटी दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ बजरंग बप्पा सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, अ‍ॅड. अजय बुरांडे, सुदामतीताई गुट्टे, अ‍ॅड. माधव जाधव याची उपस्थिती होती.


पौळ पिंपरी येथे गावकर्‍यांनी ढोल ताशा वाजवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतार्‍या वाजवून भव्य स्वागत केले. तर रामेवाडी (कासारवाडी) येथे सजविलेल्या बैलगाडीतून बजरंग बप्पा सोनवणे, बाबनभाऊ गित्ते, फुलचंद कराड आणि राजेसाहेब देशमुख यांची ढोल, ताशा आणि तुतार्‍या वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

पौळ पिंपरी येथे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले, मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरीपूत्र असून सुद्धा मी दोन दोन साखर कारखाने चालवली. शिवाय या कारखान्याच्या माध्यमातून मी मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊसतोड मजूर यांचे पैसे आम्ही बुडवीले नाहीत. तसेच आमच्या समर्थकांना जर कोणी धमकावीत असेल तर त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून उलट दोन्ही कारखाने दुप्पट क्षमतेने चालू आहेत. माझा जन्म कोणत्याही राजकारणाच्या पोटी झालेला नसताना सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे आई-वडील शेतकरी असेल तरी मला राजकीय जन्म देणारे सामान्य नागरिक हे माझे राजकीय मायबाप आहेत. असे बजरंग सोनवणे म्हणाले.

मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये जर भाजपने मतदारसंघाचा विकास केला असता तर मग त्यांना मतांची भीक मागण्याची आवश्यकता पडली नसती. जे आज मला विरोध करीत आहेत त्यांचाही ऊस मीच गाळप केला. त्यामुळे उसासाठी कोणीही घाबरण्याचे कारण नाही. असे आश्वासित केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कारखाना डुबविण्यासाठीच बहीण-भावांनी
जागा वाटून घेतल्या – फुलचंद कराड

स्वतःला विकास कन्या म्हणविणार्‍या भाजपच्या उमेदवार ते म्हणाले की जर त्या पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघाचा विकास केला असता तर त्या निवडणुकीत पराभूत झाल्याच नसत्या. तसेच वैजनाथ कारखाना बुडविण्यासाठीच या दोघा बहिण भावांनी जागा वाटून घेतल्या. याचे वाईट वाटत नाही. मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचे पाणी करून त्याची उभारणी केली तो कारखाना बंद असल्याने त्याचे मनस्वी दुःख होते. त्यामुळे या दोन्ही बहिण भावांना आता मतदाराने घरी बसण्याची वेळ आलेली आहे. असे फुलचंद कराड म्हणाले.

Tagged