corona9

जबरदस्त झटका; बीड जिल्ह्यात तब्बल 9 पॉझिटीव्ह

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातील कोरोनाची संख्या कमी होऊ लागली असतानाच आज जिल्ह्याला पुन्हा एकदा जबरदस्त झटका बसला आहे. पाठविण्यात आलेल्या 77 स्वॅब पैकी तब्बल 9 रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये बीड येथील शहेनशहा नगरमधील 26 वर्षीय महिला, झमझम कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, बशीरगंजमधील 40 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय स्त्री, 10 व 7 वर्ष वयाचा मुलगा तर धारुर तालुक्यातील चिंचपूर येथील 31 वर्षीय महिला व 8 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आलेेले आहेत. चिंचपूर येथील रुग्ण औरंगाबादहून आलेले आहेत.
बीड शहरात आज सात व धारुर तालुक्यात दोन असे मिळून 9 जण पॉझिटीव्ह आले आहेत.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड -21, सी.सी.सी., बीड-40, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-1, उपजिल्हा रुग्णालय, केज-8, उपजिल्हा रुग्णालय, परळी-3, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव-1, स्वाराती ग्रा.वै.महा.अंबोजोगाई-2 असे एकूण 76 तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

Tagged

1 thought on “जबरदस्त झटका; बीड जिल्ह्यात तब्बल 9 पॉझिटीव्ह

Comments are closed.