accident

बियाणे घेवून परतणार्‍या दोन शेतकर्‍यांचा अपघाती मृत्यू

क्राईम बीड
car accident
  • एक गंभीर जखमी 
    नेकनूर : सध्या शेतीकामे जोरात सुरु आहे. बि-बीयाणे घेवून दुचाकीवरुन गावी परतत असतांना कारच्या धडकेत दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.15) दुपारच्या सुमारास लिंबागणेश परिसरातील मुळूक चौकामध्ये झाला. या प्रकरणी लिंबागणेश पोलीसांनी कार चालकास ताब्यात घेतले आहे.

  • बंकट बाबू मोरे (वय 50), संजय बाळू सोनवणे (वय 45) अशी मयतांची नावे आहेत तर जखमी गोरख बबन मोरे (वय 32 सर्व.रा.मसेवाडी ता.बीड) यांच्यावर लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. ही तिघेजण दुचाकीवरुन (एमएच-23 एस-8146) बीयाणे घेवून मसेवाडी गावाकडे परतत होते. यावेळी लिंबागणेश परिसरतील मुळूक चौकामध्ये समोरुन भरधाव आलेल्या कारने (एमएच-12 जेझेड-6727) दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये बंकट व संजय यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोरख जखमी झाला असून त्यावर उपचार सुरु आहेत. कारच्या चालकास लिंबागणेश पोलीस चौकीचे राऊत यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान याच परिसरामध्ये असलेल्या महामार्ग पोलीसांना घटनेची माहिती मिळूनही त्यांनी घटनास्थळाकडे गेले नाही.
Tagged