बांधकामासाठी पाणी दिले नाही म्हणून एकास मारहाण

बीड

प्रतिनिधी । बीड
दि.26 ः
घराच्या बांधकामाला बोअरचे पाणी का देत नाही? या किरकोळ कारणावरून एका तरुणास रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी शहरातील धांडे नगर भागात घडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.


सतीश हनुमंत सदरे (रा.साईनगर, दुबे कॉलनी, बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. खंडेश्वरी भागातील झोपडपट्टी परिसरात राहणार्‍या किरण शिंदे या तरुणाने धांडेनगर भागात रॉडने मारहाण केली. मारहाण त्याच्या जवळील नगदी 48 हजार रुपये व मोबाईल हिसकावून घेतला आहे. मारहाणीत डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झालेली असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tagged