gevarai

सलूनच्या दुकानात करंट उतरल्याने युवकाचा मृत्यू

गेवराई बीड

  गेवराई  : नुकत्याच झालेल्या पावसात सलुनच्या दुकानात पाणी घुसल्याने या पाण्यात करंट उतरल्याने पाऊस उघडल्यानंतर दुकानात पाय ठेवताच करंटच्या दणक्याने 21 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 5 च्या सुमारास गेवराई शहरतील ताकडगाव रोडवर घडली.
दिपक दादाराव छेडदार (वय 21) असे मयताचे नाव आहे. त्यांचे शहरातील ताकडगाव रोडवर दिपक जेंटस पार्लर हे दुकान असून सोमवारी दुपारी चार नंतर सुरू झालेल्या पावसात रस्त्यावरील पाणी या दुकानात घुसले होते. दरम्यान पाऊस उघडल्यानंतर दिपक दादाराव छेडदार याने दुकान उघडून आत पाय ठेवताच त्याला विजेचा जोरदार दणका बसल्याने तो खाली कोसळला. याबाबत शेजारच्या दुकानदाराच्या ही बाब लक्षात आली असता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरील मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात केला आहे.

Tagged