विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करा

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, विद्यालये बंद आहेत. परंतू, येत्या काळात शाळा, विद्यालये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्याने करा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

उदय सामंत हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी सकाळी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, युवासेनेचे अंकित प्रभू उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे निर्बंध देखील कडक केले जात आहेत. परंतू, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, त्याठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचार विनिमय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या एकूण लसींच्या २५ टक्के लसी ह्या प्राधान्याने विद्यार्थ्यांना द्याव्यात. विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण झाल्यास शाळा, महाविद्यालयांत कोरोनाचा धोका कमी होईल, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

Tagged