१०० एकरवरील ऊस जळून खाक

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

सौंदाना येथील घटना; आगीचे तांडव सुरू

केज : महावितरण कंपनीच्या विद्युत तारांचे शॉर्टसर्किट होऊन १०० एकरवरील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना केज तालुक्यातील सौंदाना येथे आज (दि.१६) घडली.

मंगळवारी सोनेसांगवी शिवारात सलग ३० एकर ऊस जळाल्याची घटना ताजी असतानाच सौंदाना येथे ऊसाला आग लागली आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर ऊस पटल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. अंबाजोगाईसह आजूबाजूच्या नगरपालिकांचे अग्निशमन बंब सौंदनाकडे रवाना झाले आहेत. या आगीने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, जळीत ऊसाचा महसूल प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांनी तत्काळ जळीत ऊसाचे गाळप करावे व संबंधित शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने १०० नुकसानभरपाई देण्याची कारवाई करावी अन्यथा महावितरण कंपनीविरोधात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा रोष वाढून उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिला आहे.

प्रशासनाकडून पंचनामा सुरू
महसूल प्रशासन, महावितरण कंपनी व कारखाना प्रशासनाकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा सुरू करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी १०० एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Tagged