beed jilha parishad

अखेर ठरलं! जि.प.च्या प्रशासकीय इमारतीचा शनिवारी लोकार्पण सोहळा

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

जि.प.अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांची माहिती

बीड : येथील जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा विविध कारणांनी अनेकदा लांबणीवर पडला. अखेर या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या शनिवारी (दि.१९) हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई शिवाजीराव सिरसाट यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री धनंजय मुंडे हे असणार आहेत. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विशेष उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे, खासदार रजनी पाटील यांच्यासह विधानसभेचे व विधान परिषदेचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सर्व सभापती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक १ चे प्रभारी कार्यकारी अभियंता पोपटराव जोगदंड यांनी केले आहे.

Tagged