विद्यार्थ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी

परळीतील घटना

परळी : एका विद्यार्थ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना परळीत घडली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या घराच्या शेजारी काही अंतरावर शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला.

  शहरातील शासकीय आयटीआय महाविद्यालयामध्ये, जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून विध्यार्थी तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात. याच कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली. बघता बघता भांडणे एवढी टोकाला गेली की चक्क एका मुलाला अनेक मुलांनी मिळून काट्या व बेल्टने तुफान मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर घडली. यावेळी कॉलेजमधील अनेक विद्यार्थी या हाणामारीचा आनंद घेतांना दिसून आले. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला असून मारणारे नेमके कोण होते? कोणाला मारलं? हे अद्याप समजलं नाही. पुन्हा एकदा यानिमित्ताने शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तसेच, पोलिसांचा धाक उरला नसल्याचे वारंवार समोर येत आहे.

 

Tagged