बीड : जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या 57 स्वॅबपैकी 52 स्वॅब निगेटिव्ह तर 5 पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
केज येथील मयत महिलेच्या संपर्कातील नातेवाईकांचे 28 स्वॅब घेण्यात आले होते. या स्वॅबमुळे केजसह जिल्हा वासियांची चिंता वाढलेली होती. महिलेच्या संपर्कातील माळेगाव (ता.केज) येथील चौघे पॉझिटिव्ह आले आहेत. यात 36 वर्षीय महिला, 60 आणि 38 वर्षीय दोन पुरुष व 12 वर्षीय बालकाचा समावेश आहे. तर बीडमधील मसरत नगरमधील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील हिना नगर येथील आणखी एक जण पॉझिटिव्ह आला असून तो 52 वर्षीय पुुरुष आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची नोंद 90 झाली असून सक्रिय रुग्ण संख्या 27 आहे.
दरम्यान, आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून-6, सीसीसी, बीड-7, स्वा.रा.ती.वै.महा. अंबाजोगाई-2, उपजिल्हा रुग्णालय, गेवराई-2, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-5, उपजिल्हा रुग्णालय, केज-28, उपजिल्हा रुग्णालय परळी-7 असे एकूण 57 स्वॅब पाठविण्यात आले होते.