मुषकराज भाग 10 : जिल्हा कचेरीवर मोर्चा
जिल्ह्याचे मुख्य बॉस चाहूल रेषावार साहेबांसोबत आज बाप्पांना मिटींग करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मुषकाने
Continue Readingजिल्ह्याचे मुख्य बॉस चाहूल रेषावार साहेबांसोबत आज बाप्पांना मिटींग करायची होती. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या मुषकाने
Continue Readingमुषकराज भाग 9 : राशनच्या गव्हाचा काढा बालाजी मारगुडे, बीडमो.9404350898 माजलगावचा बारश्याचा कार्यक्रम आटोपून बाप्पा आणि मुषकराज पुढच्या मुक्कामी निघाले होते. इकडे पृथ्वीतलावर आल्याचा बाप्पांचा आजचा नववा दिवस होता. अजून तर अर्धा जिल्हा फिरायचा राहीला असल्याने बाप्पाने गेवराईचा बेत रद्द करून गढीवरूनच बीड गाठण्याचा निर्णय घेतला. याची खबर ‘जगवती’ या मतदारप्रमुखांच्या बंगल्यावर आणि ‘नादानबाबा’च्या बंगल्यावर […]
Continue Readingबालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898 (केपासुरी-खाटवडगाव रोडवर चार एकरमध्ये विस्तीर्णपणे असलेल्या पंचतारांकित हॉटेल टाईप बंगल्याबाहेर येऊन बाप्पा अन् मुषकराज थांबतात. बंगल्याच्या आतील आवारात भली मोठी गर्दी झालेली असते. गर्दी पाहून बाप्पा बोलतात.)बाप्पा ः मुषका आपण येणार असल्याची वर्दी दिली होती का?मुषक ः नाही बाप्पा…बाप्पा ः मग ही गर्दी कसली?मुषक ः बाप्पा आज इथं बारश्याचा कार्यक्रम […]
Continue Readingबालाजी मारगुडे, बीड मो. 9404350898 (लॉकडाउन उठल्याने नुकतीच अंतर जिल्हा बससेवा सुरु झाली होती. त्यामुळे पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय बाप्पांनी घेतला होता. उदगीर-माजलगाव बसमध्ये दोघेही बसले. एकदम चकाचक बस पाहून बाप्पांनाही आत्मिक आनंद झाला होता. एखाद्या विमानात बसल्यानंतर हवाई सुंदरीनं जेवढ्या आदबीनं आपलं स्वागत करावं त्याच्या कैकपट नम्रता कंडक्टरमध्ये आलेली दिसत होती. प्रसन्न मुद्रेनं […]
Continue Reading(साक्षात बाप्पा आपल्या दारात आलेले पाहून ‘डीएम’ साहेबांचा आनंद गगणात मावत नव्हता. त्यांच्यापासून अवघ्या 10 फुटावर बाप्पा उभे होते. कधी एकदा हे दहा फुटाचं अंतर कापतो अन् बाप्पांना साक्षात मिठी मारतो असं डीएम साहेबांना झालं होतं. ते मिठी मारण्यासाठी बाप्पांच्या अंगावर झेपावणार तोच त्यांना 11 जुनचा दिवस दिवस आठवला. ते जागेवरच थबकले. उजवा हात मनगटापासून […]
Continue Reading(भल्या पहाटेच आज मुषकराज आवरून सवरून बसले होते. कधी एकदा बाप्पा उठतात अन् मला त्या राजवाड्यात जायला मिळते असे मुषकराजांना झाले होते. मात्र पाच वाजले तरी बाप्पा उठायचं नाव घेईनात. त्यामुळे मुषकराजांनीच त्यांना उठवायचा निर्णय घेतला.)मुषक ः अहो उठाऽऽ उठा उठाऽऽ बघा जरा लोक तुमच्याही आधी कामाला लागले अन् तुम्ही खुशाल झोपलाय? भक्त आले अन् […]
Continue Readingमुषकराज : भाग 4 : त्यांना वाटतं आभाळ कोसळलं (काल अंबाजोगाईच्या सुकुमार अन् गजरंगअप्पांची रस्त्यात लागलेली भांडणं बघून बाप्पांनी आता इथूनपुढचा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाप्पा अन् मुषकराज परळीच्या दिशेने निघाले. बाप्पा रस्त्यानी येत असताना त्यांना जागोजागी घड्याळाचे गमजे घातलेले लोक दर्शन करायला येताना दिसत होते. बाप्पांनी मुषकराजांच्या कानात विचारलं.) बाप्पा ः अरे […]
Continue Reading(1616 क्रमांकाच्या फॉर्च्युनरने अंबाजोगाईची दिशा पकडली होती. सुसाट निघालेल्या फॉर्च्युनरने अचानक करकचून ब्रेक मारला. त्यामुळे टुणूक टुणूक उड्या मारून मागच्या शीटच्या बेल्टला धरून बसलेले मुषकराज धाडकनी पुढच्या शीटवर येऊन आदळले.)मुषकराज ः आगा आयोयऽऽ बबोवऽऽ बाबोवऽऽ आगाऽ आईऽऽ आईऽ ईऽऽ ईऽबाप्पा ः मुषकराज जरा नीट बसा. अशा उड्या मारल्यावर असंच होतंया. मला तर वाटलं हा रस्ता […]
Continue Reading(हे सदर केवळ मनोरंजनाच्या हेतूने आहे. त्याकडे केवळ विनोद म्हणून पहावे.)बाप्पांना घेऊन मुषकराजांनी पृथ्वीतलावर टूणकन् उडी मारली. एसट्या, विमानं, खासगी बसेस सारं काही बंद असताना एका झटक्यात इ-पास नसताना बाप्पांना ‘चेडेश्वरी’ कारखान्यापर्यंत घेऊन आलो का नाही हा अविर्भाव मुषकराजांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता. आपल्या हातातील संदूक खाली ठेवून मुषकाने असं काही अंग झटकले की अंगाची […]
Continue Readingमुषकराज…आज हरतालिकेचा दिवस म्हणजे आता पृथ्वीतलाकडे निघण्याची जवळजवळ वेळ झाली होती. चला आता आपल्या भक्तांना भेटायला मिळणार याचा अपार आनंद बाप्पांना झाला. कधी एकदा पृथ्वीतलावर जातो अन् माझ्या भक्ताच्या हातचे मोदक, लाडू खातो, असे बाप्पांना झाले होते. सगळं काही आवरून सवरून बाप्पा बस बॅग उचलण्याच्याच तयारीत होते. पण दूरदूर वर त्यांना मुषकराज काही दिसत नव्हते. […]
Continue Reading